Viral Video Virar Locals Catch Suspected Scooter Thief : एखाद्या माणसाने तुमची एखादी मौल्यवान वस्तू चोरली तर तुम्ही काय कराल? एकतर त्याला माराल, त्याच्या मागे पळून आपलं सामान घेऊ किंवा शेवटचा पर्याय म्हणजे पोलिसांकडे तक्रार करायला जाल. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये स्थानिकांनी चोराला फक्त जेवणच दिले नाही तर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यापूर्वी सिगारेटही ओढण्यास दिली.

विरारमध्ये ग्लोबल सिटी परिसरात मंगळवारी पहाटे एक विचित्र घटना घडली आहे. जिथे स्थानिकांनी एका लाल रंगाची स्कूटर चोरल्याचा आरोपात एका माणसाला पकडले आहे. घाबरलेल्या चोराला याबद्दल वारंवार विचारणा करण्यात आली. पण, त्याची भाषा कोणालाच कळत नव्हती. कदाचित तो तेलगू भाषेत बोलत होता; म्हणून त्याला तेलगू भाषा येणाऱ्याशी फोन लावून दिला. पण, त्यालाही चोराची भाषा कळत नव्हती. त्यामुळे नंतर जे घडलं त्यामुळे अनेक जणांना धक्का बसला होता.

नागरिकांनी चोराला दिला प्रेमाने निरोप (Viral Video)

चोराला पडकले या गोष्टीच आश्चर्य नाही तर स्थानिकांनी पोलिसांकडे सोपवण्यापूर्वी चोराला सिगारेटही ओढायला दिली. चोराला त्रास देण्याऐवजी, रहिवाशांनी चोराला अन्न दिले. व्हिडीओत पाहू शकता की, अज्ञात माणूस घाबरून धूम्रपान करत होता. या संपूर्ण घटनेदरम्यान, चोर शांत राहतो आणि त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असतो. नक्की काय घडलं एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओमध्ये नंतर, एक पोलिस घटनास्थळी येतो आणि त्या माणसाला पार्श्वभूमी आणि नोकरीबद्दल विचारपूस करण्यास सुरुवात करतो. अखेर, आरोपीला पोलिसांच्या दुचाकीवरून नेले जाते. नागरिकही चोराला अगदी प्रेमाने निरोप देतात. पण, आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे का? याची पडताळणी करण्यासाठी कोणताही अधिकृत अहवाल अजूनपर्यंत सापडला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @virarmerijaan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.