Viral Video Woman Aware Bus Passengers : आपण ज्या परिसरात वावरतो तो स्वच्छ आणि सुंदर ठेवणे अगदीच महत्त्वाचे असते. त्यासाठी स्वच्छता कर्मचारी सकाळी लवकर उठून परिसर स्वच्छ करतात. त्यामुळे जागृत नागरिक म्हणून किंवा कधी प्रवासी म्हणून, आपण सुद्धा सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर इथे-तिथे कचरा फेकून न देता, इकडे-तिकडे न थुंकता परिसर स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहेत. तर आज सोशल मीडियावर याच गोष्टीची आठवण करून देणारा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
कर्नाटकात एका महिलेने बस प्रवाशांना कचरा न टाकण्याचे आणि स्वच्छतेची सामूहिक जबाबदारी घेण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छता गृह कालिका केंद्राच्या डॉक्टर तुम्मला अशी ओळख असलेल्या या महिलेने राज्य बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कन्नडमध्ये भाषण दिले. बसमधून किंवा रस्त्यावर कचरा फेकू नये. कारण – स्वच्छ भारत हे केवळ पंतप्रधानांचे नाही तर प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असले पाहिजे; असे त्यांनी म्हंटले.
पंतप्रधानांचे नाही तर प्रत्येक भारतीयांचे स्वप्न (Viral Video)
तुम्ही व्हायरल व्हिडीओत पहिले असेल की, महिला माईक हातात घेऊन ट्रेनमध्ये चढली आणि एकदाच वापरता येणारे प्लास्टिक टाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छ भारतासाठी योगदान देणारी छोटी पण प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. भाषण देणाऱ्या महिलेचे शब्द, जरी साधे असले तरी, प्रवाशांना खूप भावले; त्यामुळे अनेकांनी तिच्या कर्तव्याच्या भावनेचे कौतुक सुद्धा केले आहे. त्यामुळे प्रवाशांशी संवाद साधून त्यांनी स्वच्छता आणि नागरी कर्तव्याचे महत्त्व याबद्दल जागरूकता पसरवली.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Mahaveer_VJ या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून या महिलेशी सहमती दाखवताना दिसत आहेत आणि “प्रवासादरम्यान कचरा बाहेर फेकण्यापेक्षा कारच्या दारात साइड पॉकेट्स वापरा. आता कारसाठीही लहान डस्टबिन उपलब्ध आहेत”, “महिला खूप छान काम करत आहे. गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये झालेल्या एका परिषदेत त्यांना भेटण्याचे भाग्य लाभले” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.