Viral Video Mother Handle Work And Family : काम करताना एखादा कॉल किंवा मेसेज जरी आला तरीही आपले लक्ष विचलित होते. पण, कधी तुम्ही तुमच्या आईकडे बघितलं आहे का? कितीही तिचे लक्ष इकडे तिकडे झाले तरीही ती एका वेळी अनेक काम करताना आपल्याला दिसते. कामाच्या ठिकाणी आपल्या बाळांची काळजी घेणाऱ्या आईचे व्हिडीओ अनेकदा लक्ष वेधून घेतात आणि काम करणाऱ्या महिलांना येणाऱ्या आव्हानांना आणि त्यागांना अधोरेखित करतात. तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

@jaswanth_adapa या युजरने डोळ्यांत पाणी आणणारे एक दृश्य पाहिले. हैदराबादमध्ये रस्त्याकडेला एका छोट्या स्टॉलवर एक महिला पोळ्या भाजताना दिसते आहे. फक्त पोळ्याच नाही तर खांद्यावर तिने तिच्या लेकराला सुद्धा सोपवलं आहे. यामुळे उपजीविका आणि मातृत्वाच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळण्याचा तिचा दृढनिश्चय अधोरेखित होतो आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया आता प्रत्येक क्षेत्रात उतरल्या आहेत. असे असले तरीही त्यांना नोकरी बरोबरच मुला-बाळाचा सांभाळ, जेवण करण्याची जबाबदारीही उचलावी लागते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

तू आई नाही तू साक्षात देवी आहेस (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @jaswanth_adapa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच“ती फक्त ज्वारीची भाकरी नाही. तर आईचं प्रेम सुद्धा देते आहे असं वाटतंय. हे फक्त ‘मल्टिटास्किंग’ नाही, तर तिचे कर्तव्य आहे. जी सगळी लोकं जबाबदाऱ्या सुंदरपणे सांभाळतात, त्यांना सलाम” ; अशी कॅप्शन पोस्टला दिली आहे.व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्राम युजरने लाईव्ह लोकेशन तिचा पत्ता आणि तिच्या नवऱ्याचा मोबाईल नंबर कॅप्शनमध्ये नमूद केला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहेत आणि “मुकुट नसणारी राणी”, “मला तिच्या बाळाला थोडा वेळ धरून ठेवता आले असते किंवा तिला पोळ्या बनवण्यास मदत करता आली असती जेणेकरून ती बाळासोबत थोडा वेळ बसू शकेल” , “देव सर्वत्र असू शकत नाही, म्हणूनच त्याने आईला बनवलं आहे”, “मी दररोज माझ्या बाळाला एका हाताने घेऊन माझे रोजचे जेवण बनवते. पण ती जे करत आहे ते खूपच वेगळं आहे”, “प्रेम आणि जबाबदाऱ्या” , “तू आई नाही तू साक्षात देवी आहेस”; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.