Viral Video CRPF Officer Clicked Pictures Secretly : देशात मुली आणि महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. आजकाल बहुतांश ठिकाणी महिलांना एकट्यानं घराबाहेर पडणं असुरक्षित वाटू लागले आहे; ज्यामुळे स्त्रिया सहसा बाहेर जाणेही टाळतात. महिलांची सुरक्षा करण्यासाठी अनेक सेवाही उपल्बध असतात. पण, जर तिचं माणसं आपल्याबरोबर विश्वासघात करत असतील तर? आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये असेच काहीतरी घडले आहे.
१६ सप्टेंबर रोजी सकाळी दिल्ली विमानतळ (टर्मिनल १) वर आयशा खानने दिल्ली एअरपोर्टवर तिच्याबरोबर घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीने फोनवर असल्याचे नाटक करत आयशाचे लपून फोटो काढत होता. तसेच हा अज्ञात माणूस सीआरपीएफ अधिकारी आहे असे सुद्धा तिने नमूद केले आहे. मग आयशाने त्याच्याकडे फोन मागितला. तेव्हा त्याच्याकडे आयशाच्या पायांचे फोटो होते. “तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, काहीतरी लाज बाळगा” ; असे आयशा म्हणाली आणि व्हिडीओचा शेवट झाला.
तरुणीच्या धाडसाचं होतंय कौतुक… (Viral Video)
आयशाने जाब विचारल्यास अखेर सीआरपीएफ अधिकाऱ्याने फोटो डिलीट करण्यास सुरुवात केली. त्याच्या म्हणण्यानुसार फोटो स्वयंचलितपणे काढण्यात आले होते आणि फोटो डिलीट करताना त्याच्या चेहऱ्यावर आपण काहीतरी चुकीचं केलं आहे असे हावभाव देखील नसतात. सगळ्यात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे तो माणूस सीआरपीएफमध्ये होता. सीआरपीएफ लोकांची सुरक्षा करण्यासाठी असतो. जर एखादी महिला विमानतळासारख्या सुरक्षित ठिकाणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांखाली आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतही सुरक्षित नसेल, तर मग तिला नेमकं कुठे सुरक्षित वाटणार? जनतेच्या विश्वासाचे रक्षण करण्याचे काम करणारे लोकच विश्वासघात करतात ; असे मत तिने या धक्कादायक प्रसंगानंतर मांडले आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @justbeingaayesha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि तरुणीच्या धाडसाचे कमेंटमध्ये अनेक जण कौतुक करत आहेत “स्वतःसाठी उभे राहिल्याबद्दल शाब्बास म्हंटले आहे”, तर काही जण तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक असल्याबद्दल बोलताना दिसत आहेत. एवढेच नाही तर “काय अडचण आहे…..तुम्ही आधीच तुमचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहात….सर्वजण ते पाहत आहेत” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.