Viral Video: आरोग्याच्याबाबतीत आपल्यापैकी अनेकजण नेहमी सतर्क असतात. फास्टफूड, तळलेले पदार्थ न खाता फळे आणि भाज्या खाण्याला प्राधान्य देतात.पण या भाज्या आणि फळे देखील बनावट असतील तर? होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. आजकाल बाजारात बनावट भाज्या,बनावट फळे,बनावट धान्य, बनावट साखर,बनावट दूध सर्रासपणे विकले जात आहे. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू सोशल मीडियावर अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत जिथे लोकांना ‘बनावट’खाद्यपदार्थ विकून त्यांची फसवणूक झाल्याची खात्री पटली आहे. अनेकांनी असा दावा केला की अन्न खरे दिसले पण नकली आहे. ​​असाच एक व्हिडिओ ऑनलाइन शेअर करण्यात आला आहे जिथे एका महिलेने दावा केला आहे की, तिला स्विगी मार्टमधून ‘बनावट’ कोबी मिळाला आहे.

आपला दावा सिद्ध करण्यासाठी महिलेने कोबीची पाने जाळण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीच झाले नाही. त्यानंतर तिने पुढे जाऊन पान फाडण्याचा प्रयत्न केला,पण ती पुन्हा अयशस्वी झाली. खरं तर,महिलेने दावा केला की, जळल्यानंतर पान आणखी ‘घट्ट आणि ताणलेले’ होते.

हेही वाचा –भरमांडवात नवरदेव मोबाईलमध्ये बघत बसला होता ‘ही’ गोष्ट! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “लग्नाचा खर्च…”

u

u

हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याला मोठ्या प्रमाणात विभागला गेला आहे. बहुतेक लोकांनी त्या महिलेची बाजू घेतली आणि ‘नकली’ भाजी बनवण्याच्या ‘स्वस्त’ पद्धतींवर चर्चा केली तर बाकीचे लोक असहमत होते आणि त्या महिलेच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हेही वाचा –“हे चीनी लोक काहीही खातात”; चीनच्या पिझ्झा हटमध्ये विकला जातो तळलेल्या बेडकाचा पिझ्झा, फोटो होतोय तुफान Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेघा कदूर या हँडलने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.या पोस्टला कॅप्शन दिले होते,“खरा विरुद्ध बनावट कोबी?मित्रांनो जर तुम्हाला ही नकली किंवा खरा कोबी वाटत असेल तर कृपया कमेंट करा.यामुळे इतरांनाही भाजी खरेदी करताना मदत होईल.” व्हिडिओ खूप पूर्वी (१७ ऑक्टोबरला शेअर केला गेला होता जो सध्या चर्चेत आला आहे आणि ज्याला २६०लाख पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.