Viral Video Woman & TTE Fight Dispute Over Ticket : रेल्वेस्थानकावर पोहचल्यावर अरेच्चा, तिकीट काढायचे विसरलो म्हणून, कधी तिकीट काऊंटरवर लांबच लांब रांगा पाहून, तर कधी पैसे वाचवायचे म्हणून आणि आपल्याला कोण पकडणार अशी घमेंड घेऊन काही जण तिकीट न काढता प्रवास करतात. मग टीटीईने पकडले की, अशी माणसे कारणे देत स्वतःचा आणि तिकीट तपासणाऱ्यांचा वेळ वाया घालवतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या सरकारी शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
व्हायरल व्हिडीओ बिहारचा असून विनातिकीट एक महिला एसी कोचमधून प्रवास करताना दिसते आहे. ट्रेनमध्ये असणाऱ्या स्विच बोर्डला मोबाईल चार्जिंगला लावून अगदी स्वतःची सीट असल्यासारखा हक्क दाखवताना ती दिसत आहे. तितक्यात तिथे टीटीई येतो आणि एसी तिकीट दाखवायला सांगतो. पण, महिलेकडे तिकीट नसल्यामुळे ती टाळाटाळ करत असते. त्यानंतर टीटीईला महिलेकडे तिकीट नसल्याची कल्पना येते, त्यामुळे टीटीई महिलेला कोचमधून निघून जाण्याची नम्रपणे विनंती करतो. पण, महिला टीटीईला उर्मटपणे उत्तर देत, “तुम्ही मला त्रास देत आहात” असा आरोप करते.
रेल्वे तिच्या मालकीची आहे का? (Viral Video)
त्यावर टीटीई महिलेला, “तुम्ही सरकारी कर्मचारी आहात, तुम्ही एक शिक्षक आहात, तरीही तुम्ही तिकीट काढलेलं नाही, तुम्ही कोचमधून निघून जा” असे म्हणतो. त्यानंतर महिला सीटवरून उठते आणि बराच वेळ हा शाब्दिक वाद सुरू राहतो. तेव्हा महिला टीटीईला “फालतू” म्हणत कोचमधून निघून जात असते, यामुळे महिलेशी नम्रपणे बोलणारा टीटीईसुद्धा संतापतो आणि “फालतू मी नाही तू आहेस” असे म्हणतो. टीटीई आणि प्रवासी महिलेचा वाद व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ShoneeKapoor या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. व्हिडीओ पाहून अनेक जण संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. “नशीब संपूर्ण संवाद रेकॉर्ड केला होता, नाही तर खोटा आरोप लावून अपयशी ठरवले असते”, “हे खरोखरच वाईट आहे”, “ती चुकीची आहे, रेल्वे तिच्या मालकीची आहे अशी वागते आहे ही”, ‘अनेक महिलांना माहीत आहे की, भारतातील कायदे त्यांच्या बाजूने आहेत, त्याच्या आधारावर त्या काहीही करू शकतात असे त्यांना वाटते; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत…
