सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला पोट धरून हसायला लावतात तर काही प्रेरणादायी व्हिडीओ आपली मनं जिंकतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने रस्त्यावर उघड्यावर राहणाऱ्या कुत्र्यांसाठी एका छोट्या घराची सोय केलेली दिसत आहे. नेमके काय घडले जाणून घ्या.
या व्हिडीओमध्ये एक तरुणी गाडीतून एक मोठा ड्रम बाहेर काढताना दिसत आहे. या ड्रममध्ये गाद्यादेखील ठेवण्यात आल्या आहेत. हे छोटे घरं तिने उघड्यावर राहणाऱ्या कुत्र्यांसाठी तयार केले आहे. थंडीच्या दिवसात तर अशा प्राण्यांना आणखी त्रास होत असेल. याचा विचार करून तरुणीने या भटक्या कुत्र्यांसाठी हे घर तयार केले आहे. हे घर पाहण्यासाठी तिथे कुत्रे जमा झाल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा- Video: करोनापासून वाचण्यासाठी या जोडप्याने केलेला भन्नाट जुगाड एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ:
या तरुणीच्या मदत करण्याच्या भावनेने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला असणाऱ्या, निवारा नसणाऱ्या प्राण्यांना जमेल तितकी मदत करण्याचा संदेश या व्हिडीओतून दिला जात आहे.