Jharkhand Woman Video: आपला भारत हा एक असा देश आहे, जिथे कधी काय पाहायला वा ऐकायला मिळेल हे सांगता येत नाही. भारतात अगदी पूर्वीपासून अनेक रहस्यमय घटना घडलेल्या आपण ऐकले आहे, ज्यांचा उलगडा होणं भल्या भल्यांनाही शक्य झाले नाही. त्यामुळे या घटना कधी खऱ्या तर कधी खोट्या असल्याचेदेखील म्हटले जाते. आताच्या एकविसाव्या शतकातही अशा प्रकारच्या अनेक रहस्यमय, विचित्र घटना घडल्याचे आपण पाहिलेच असेल. सध्या अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे, जी पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत.

सोशल मीडियामुळे विविध घटनांचे व्हिडीओ सहज आपल्याला पाहता येतात. ज्यावर कधी अपघाताचे व्हिडीओ, प्राण्यांची शिकारी करतानाचे व्हिडीओ असतात. अशाप्रकारच्या व्हिडीओंमुळे बऱ्याचदा आपला थरकाप उडतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यातील घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Jharkhand Woman Video)

हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असून समोर आलेल्या या घटनेत झारखंडमधील एक महिला जवळपास तीन महिन्यांपूर्वी हरवली होती, जी आता उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील गुहेमध्ये सापडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती महिला नागिणीप्रमाणे तोंडातून आवाज काढताना आणि सरपटताना दिसत आहे. घरातून हरवलेली ही महिला तब्बल तीन महिन्यांनंतर असामान्य अवस्थेत सापडली असून, ती यामुळे नागिणीसारखी वागताना दिसत आहे.

विचित्र गोष्ट अशी की, ही महिला सापडल्यानंतर तिला गुहेतून बाहेर काढल्यानंतर तिला नागीण समजून उत्तर प्रदेशातील सोनभद्र गावातील काही महिला तिचा श्रृंगार करून तिची पूजा करत होत्या. स्थानिक ग्रामस्थांच्या मते गुहेत वेळ घालवल्यानंतर महिलेला दैवी शक्ती प्राप्त झाली आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

दरम्यान, झारखंडमधील ही महिला तिच्या घरातून सोनभद्र येथील गुहेत नेमकी कशी आणि कधी पोहोचली याचे स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेले नाही.

महिलेच्या कुटुंबीयांना महिला स्वप्नात दिसली

या महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, “दोन-तीन महिन्यांपूर्वी ती बेपत्ता झाली होती. आम्ही तिचा शोध घेतला, पण ती कुठेही सापडली नाही. परंतु, त्यानंतर कुटुंबीयांनी महिलेचा शोध कसा घेतला हे सांगताना नाटकी (खोटे) कारण दिले, ज्यात त्यांनी सांगितले की, एके दिवशी महिला कुटुंबातील एका सदस्याच्या स्वप्नात आली आणि तिने ती उत्तर प्रदेशमधील सोनभद्रच्या गुहेत आहे”, असे सांगितले.

हेही वाचा: ‘चिमणा, चिमणीचे लगीन…’, गाण्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तुम्हालाही येईल शाळेची आठवण

पाहा व्हिडीओ:

त्यानंतर कुटुंबीयांनी उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथील गुहेमध्ये महिलेला शोधण्यासाठी धाव घेतली. मात्र, जेव्हा कुटुंबीय सुरुवातीला गुहेत पोहोचले तेव्हा त्यांना ती महिला सापडली नव्हती, त्यानंतर त्यांनी गुहेच्या गेटवर भजन केले. त्यानंतर ही महिला सापाप्रमाणे सरपटत गुहेमधून बाहेर आली. ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून आसपासच्या परिसरातील लोक त्या महिलेला पाहण्यासाठी सोनभद्र येथे गर्दी करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ X( ट्विटर) वरील @Rahul Saini या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.