सोशल मीडियावर बरेच मजेदार व्हिडीओ आहेत परंतु हा व्हिडीओ पाहून तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल. खरं तर, मुलाखत देण्यासाठी गेलेल्या एका मुलीने तिच्या बहिणीला ऑफिसमध्ये जाऊन मारलं आणि या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या पतीशी संबंध असल्याचे कळल्यावर तिने तिच्या  बहिणीला ऑफिसमध्ये जाणून मारहाण केली. तिची बहिण ऑफीमध्ये मुलाखत देण्यासाठी गेली होती तेव्हाच ही घटना घडली.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

मुलीला मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की एक मुलगी ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून मुलाखत देत आहे. मग एक महिला त्या ऑफिसमध्ये प्रवेश करते आणि मुलीचे केस पकडून तिला खाली पाडते. यानंतर, ती मुलीच्या डोक्यावर मारू लागते.या दरम्यान, ऑफिसमध्ये उपस्थित लोक घटनास्थळी पोहोचतात आणि मुलीला निघून जाण्यास सांगतात पण ती महिला तिला सतत मारहाण करत राहते. डॅलस नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

मारहाणीचा व्हिडीओ गुप्तपणे केला रेकॉर्ड

असे सांगितले जात आहे की कार्यालयात उपस्थित असलेल्या कोणीतरी गुपचूप मुलीच्या मारहाणीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ आतापर्यंत ४० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि ५६ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. त्याचबरोबर १० हजारांहून अधिक लोकांनी रिट्विटही केले आहे.

(हे ही वाचा: रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या महिलेचे वाचवले प्राण वाचण्यासाठी धावून आले महाराष्ट्र पोलीस)

वापरकर्त्यांनी अशा दिल्या प्रतिक्रिया

अनेक वापरकर्ते या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने सांगितले की, महिलेने तिच्या बहिणीला जेवढे निर्घृणपणे मारले आहे, तेवढेच तिने तिच्या पतीलाही मारले पाहिजे. यात तिच्या पतीचाही तितकाच दोष आहे. त्याचवेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले की, या मुलीला नक्कीच नोकरी मिळाली पाहिजे आणि तिला आरोग्य विमा मिळाला पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमचं काय मत आहे या घटनेवर?