Youngboy Dangerous Stunt: सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेंड्सवर अनेकांचे अचूक लक्ष असते. या ट्रेंडनुसार लोक गाणी, रील्स, व्हिडीओ बनवताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवघेणा स्टंट करीत आहे.

समाजमाध्यांवर अनेकदा यावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. बऱ्याचदा अपघात हे स्टंट करण्यामुळे होतात. त्यावर नेटकरी तीव्र संतापदेखील व्यक्त करतात. अशा विविध प्रकारच्या स्टंटमुळे अनेकांनी आजपर्यंत आपला जीव गमावला आहे. दरम्यान, नुकताच असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण एक उंचवट्यावरून भयानक स्टंट करताना दिसतोय, जे पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Pune man jumps into river after quarrel with wife
Pavana River: पत्नीशी भांडून पतीनं नदीत मारली उडी; बचावकार्यात अग्निशमन दलाला आले अपयश, पण ८ तासानंतर…
A man was attacked by a street dog
आईशप्पथ! कुत्र्याला जीव लावणं पडलं महागात; अंगावर चढून केलं असं काही…, VIDEO पाहून अंगावर येईल काटा
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Drunk Auto Drivers Assault Traffic Guard in Thane, Video Goes Viral
Video : मद्यधुंद रिक्षाचालकांचा भररस्त्यात राडा! तरुणीच्या गाडीला दिली धडक, वाहतूक पोलिसाच्या मारली कानाखाली

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण एका गडाच्या तटबंदीवरून उड्या मारत जात आहे. त्यानंतर पुढे जाऊन तो कट्ट्यावर चढून मागच्या बाजूला उंच उडी मारतो आणि पुन्हा स्वतःचा तोल सावरून कट्ट्यावर उभा राहतो. तरुणाच्या मागे दिसत असलेली दरी खूप खोल असून, चुकून तरुणाला स्वतःचा जीव सावरता आला नसता, तर त्याला त्याचा जीव गमवावा लागला असता. हा जीवघेणा स्टंट पाहून युजर्स तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @iabhi.choudhary या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स विविध प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: “शिक्षक जोमात, विद्यार्थी कोमात…” विद्यार्थ्याने शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्यानंतर शिक्षकाने दिलं भन्नाट उत्तर; व्हॉट्सॲप चॅट VIRAL

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हायरल व्हिडीओतील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “हे मी पण ट्राय केलं आणि आता मी स्वर्गात आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “अरे भावा, आईसाठी तरी हे नको करू” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप भयानक” चौथ्या युजरने लिहिलेय, “हा किल्ला कोणता आहे?”