Viral Wedding Video : लग्न म्हणजे वधू आणि वर यांच्या आयुष्याची एकत्रित सुरुवात. त्यादरम्यान कुटुंबात असणारी लगबग, खरेदी, धापवळ अगदी पाहण्यासारखी असते. पण, लेकीचे लग्न थाटामाटात पार पडावे यासाठी बाबांना एकेक पैसा आधीपासून साठवून ठेवावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लग्नातले जेवण. लग्नात किती मंडळी येणार याचा अंदाज जरी बांधला तरी केव्हा लग्नातले जेवण संपते आणि कधी कधी खूप जास्त उरते. तर काही वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ पाहून प्रमाणापेक्षा जास्त जेवण ताटात घेतात आणि मग नंतर फेकून देतात.
पण, आज व्हायरल होणारे दृश्य पाहून तुम्हीही भारावून जाल. व्हायरल व्हिडीओ लग्न सभारंभाचा आहे. लग्नात पंगतीत सगळ्यांना जेवायला वाढलेले दिसत आहे. पण, अचानक पाऊस आल्यामुळे पंगतीतील सगळेच जण उठून गेले आहेत. सगळ्यांची पदार्थांनी भरलेली ताटं पंगतीत दिसत आहेत. पण, पावसामुळे सगळेजण स्वतःचे ताट सोडून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी इथे-तिथे पाळताना दिसत आहेत. पण, फक्त दोन माणसे भरपावसात पंगतीत वाढलेले जेवण शांतपणे जेवताना दिसत आहेत.
जेवण वाढण्यासाठी आलेल्यांचेही कौतुक (Viral Video)
काही जण कर्ज काढून, तर कोणाकडून उसने घेऊन, दागिने गहाण ठेवून लग्नातील खर्च भागवतात. त्यामुळे काही जणांना याची जाणीव असते. लग्नात जेवण वाया घालवणे किंवा टाकून देणे म्हणजेच या पैशांचा, जेवणाचा नकळत अपमान आहे. लग्नातील या जेवणाचा अपमान न करण्यासाठी ही दोन माणसे भरपावसात पंगतीत जेवायला बसली आहेत. तसेच या दोन माणसांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी काही माणसे त्यांच्या डोक्यावर प्लास्टिक घेऊन उभी आहेत. तर काही माणसे त्यांना जेवणही वाढताना दिसत आहेत.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thestricttrolls या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “त्यांना अन्नाची आणि मध्यमवर्गीय वडील लग्नासाठी जेवणाची व्यवस्था कशी करतात याची जाणीव व किंमत आहे” ; अशी कॅप्शन व्हिडिओला दिली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “असं सगळं फक्त गावाकडेच पाहायला मिळते”, “पावसापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना जेवण वाढण्यासाठी आलेल्यांचाही आदर”, “शेतकऱ्यालाच कळली अन्नाची किंमत” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.