Virat Kohli Angry On Impersonator Selling Puma Shoes demands Action against Who Copy Kohli Look And Style Personality Right | Loksatta

विराट कोहली तोतयांमुळे हैराण! कोहलीचा लुक कॉपी करणाऱ्यावर थेट कारवाईची मागणी, काय आहे प्रकरण?

Virat Kohli Personality Rights: विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरी मध्ये बांद्रा येथील प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट म्हणजेच लिंकिंग रोड येथील एक फोटो शेअर केला आहे,या फोटोत…

विराट कोहली तोतयांमुळे हैराण! कोहलीचा लुक कॉपी करणाऱ्यावर थेट कारवाईची मागणी, काय आहे प्रकरण?
विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरी मध्ये बांद्रा येथील प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट म्हणजेच लिंकिंग रोड येथील एक फोटो शेअर केला आहे.

Virat Kohli Personality Rights: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या कुटुंबासह भारतातच सुट्टी एन्जॉय करत आहे. बांगलादेश दौऱ्यासाठी कोहली तयारीला लागला आहे. विराट कोहलीची फॅन फॉलोईंग किती जबरदस्त आहे हे वेगळे सांगायला नको. भारतात सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोवर्स असणाऱ्या यादीत कोहली अव्वल आहे. किंग कोहलीच्या नावाने इन्स्टा,फेसबुकवर शेकडो फॅन पेज आहेत. यातून कोहलीचे, अनुष्का शर्मा व दोघांची लेक वामिकाचे अनेक फोटो व्हिडीओ शेअर केले जातात मात्र काही वेळा सेलिब्रिटींचेही खाजगी आयुष्य असते याचा चाहत्यांना विसर पडतो. काही जण तर कोहलीची कॉपी करताना पाहायला मिळतात, कोहलीसारखी बॉडी, कोहलीचा हेअरकट, सगळं काही जसच्या तसं, हे सर्व जोपर्यंत प्रेमाने केलं जातं तोपर्यंत ठीक पण यातून अनेकदा फसवणूकही होताना पाहायला मिळते. यावरूनच आज विराट कोहलीने थेट तक्रार केली आहे.

विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरी मध्ये बांद्रा येथील प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट म्हणजेच लिंकिंग रोड येथील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत Puma कंपनीच्या नावाचा एक स्टॉल असून तिथे एक व्यक्ती कोहलीचा लुक कॉपी करून उभा असल्याचे दिसत आहे. कोहली हा पुमाचा अधिकृत अँबेसेडर आहे, तो आपल्या इंस्टाग्रामवरून अनेकदा पुमा उत्पादनाची जाहिरात करत असतो. पण कोहलीने आज शेअर केलेल्या फोटोमधील व्यक्ती कोहलीचा लुक करून इतरांना खोटे पुमाचे शूज विकत आहे त्यामुळे कोहलीने यासंदर्भात तक्रार करून पुमाला या प्रकरणी लक्ष घालण्याचा सल्ला दिला आहे.

विराट कोहली इंस्टाग्राम

(फोटो : विराट कोहली इंस्टाग्राम)

हे ही वाचा << Video: ‘ही’ जगातील सर्वात मोठी चूक.. विराट कोहलीने व्हायरल व्हिडीओत दिलं थेट उत्तर

दरम्यान, सेलिब्रिटींची शैली, आवाज, फोटो कॉपी करण्यावरून वाद अलीकडे चांगलाच चर्चेत आहे. स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनी याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरून न्यायालायने अंतरिम आदेश देत यापुढे अमिताभ बच्चन यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या प्रसिद्धीचा वापर करून कोणतेहो उत्पादने विकण्यासाठी त्यांच्या फोटोचा, आवाजाचा कुणी वापर करू शकणार नाही”,असे सांगितले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 09:33 IST
Next Story
छताला चिकटलेला फुगा काढण्यासाठी त्याने मुलालाच वर फेकले अन्…; Viral Video पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल