Watch Passenger Confronts Lawyer Lady In Mumbai Local Train For Sitting With legs On Seat | Loksatta

‘मी वकील आहे…’; मुंबई लोकलमधील ‘या’ तरुणीच्या व्हिडीओवर नेटकरी का भडकले एकदा पाहाच

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलमधील एका तरुणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

mumbai local video
photo: social media

Mumbai Local Train Viral Video: नुकताच मुंबई लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक प्रवासी समोरच्या सीटवर बसलेल्या जोडप्याशी वाद घालताना दिसत आहे. वास्तविक, तरुणी समोरच्या सीटवर पाय पसरून बसली होती, त्यानंतर प्रवाशाने तिला पाय खाली ठेवण्यास सांगितले. मात्र तिने काही ऐकले नाही. याउलट या जोडप्याने समोरच्या प्रवाशासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर प्रवाशाने तुम्ही कोण आहात असं विचारले असता, मी वकील आहे आणि आम्ही पाय पसरूनचं ट्रेनमध्ये बसणार आहोत असं ते म्हणाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर बसलेल्या प्रवाशाने ही घटना आपल्या फोन कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आहे.

लोकलमध्ये पाय पसरवून बसलेली ही तरुणी व्हिडिओच्या शेवटी समोरील प्रवाशाकडून कॅमेरा हिसकावण्याचा देखील प्रयत्न करते. प्रवाशाने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आणि मुंबई पोलिस आणि मध्य रेल्वेला देखील टॅग केले आहे.

येथे पाहा व्हिडिओ

पोलिसांनी तपासाचे आदेश दिले

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या पोस्टवर लोक आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही जे केले ते योग्यच केले.’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘तो वकील आहे पण त्याला याची जाणीव नाही.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘अशा लोकांना ट्रेनमधून हाकलून दिले पाहिजे.’ तसंच हा व्हिडीओ आतापर्यंत असंख्य लोकांनी पहिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 15:53 IST
Next Story
परीक्षागृहात ५०० मुलींसोबत १ मुलगा; ते दृष्य बघूनच मुलाला आली चक्कर