कर्करोगाचा शेवटचा टप्पा अनेकदा रुग्ण आणि कुटुंबातील सदस्यांसाठी खूप वेदनादायक असतो. शेवटच्या काही आठवड्यांत किंवा महिन्यांत त्यांच्या वेदना कमी करणे आणि त्यांना आनंदी जीवन प्रदान करणे हा सर्वात चांगला उपाय ठरू शकतो. तर ही बाब लक्षात ठेवून बागची करुणाश्रय पॅलिएटिव्ह केअर सेंटर, भुवनेश्वर यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णांसाठी एक सेवा सुरू केली आहे. कर्करोग रूग्णांच्या जीवनाच्या शेवटच्या काळात विश्रांती देण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. येथे रुग्णांना मोफत सेवा दिली जाणार आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वरमध्ये ” बागची श्री शंकरा कर्करोग केंद्र आणि संशोधन संस्था ” (BSCCRI या नवीन कर्करोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी या केंद्राचे उद्घाटन केलं आहे. या केंद्राचे उद्दिष्ट रुग्णांना किफायतशीर दरात उपचार उपलब्ध करून देणं आहे. ओडिशातील या केंद्रा बद्दल कळताच सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी खूप कौतुक केलं आहे.

DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…

हेही वाचा…VIDEO: फटाक्यांनी भरलेला खोका डोक्यावर घेतला अन्…; व्यक्तीचा ‘हा’ जीवघेणा स्टंट पाहून चक्रावाल

पोस्ट नक्की बघा…

आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी कर्करोग केंद्र आणि संशोधन संस्थेचे काही फोटो व माहिती शेअर केले आहेत. तर हे पाहून आनंद महिंद्रा यांनी केवळ राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले नाही तर कर्करोगावर उपचार करण्यासाठी गरज असलेल्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचविण्याचे आवाहन केलं आहे. एकदा पाहाच आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली पोस्ट.

आनंद महिंद्रा यांनी आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी पोस्ट रिपोस्ट करीत लिहिले की, “किती उदार प्रकल्प आहे हा… तुमचे राज्य आणि आपला देशात असे चांगले ठिकाण बनविल्याबद्दल मी तुम्हाला आणि सुस्मिता यांना सलाम करतो. ज्यांना या उपचाराची, काळजीची अत्यंत गरज आहे अशा सर्वांपर्यंत आपण हा संदेश पोहोचवला पाहिजे” ; अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे. सोशल मीडियावर या पोस्ट आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra या तर आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांच्या @arunbothra या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आल्या आहेत.