Wedding Video Groom Dance: सध्या लग्नांचा सीझन सुरू आहे. लग्नसोहळा म्हटलं की फक्त रीतीरिवाज नाहीत, तर मस्ती, नाचगाणीशिवाय लग्न पूर्णच होत नाही. सोशल मीडियावर असे लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दररोज नवनवीन व्हिडीओ समोर येतात. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने खास प्रयत्न करत असतो. अशाच एका उत्साही नवरदेवाचा सध्या सोशल मीडियावर लग्नाच्या वरातीमधील डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात नवरदेवाचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल काय तो त्याचा उत्साह. तर नेटकरीही नवरदेवाच्या जबरदस्त डान्सचे कौतुक करतायेत.

लग्नात सर्वांचं लक्ष हे नवरी अन् नवरदेवाकडेच असतं. लग्न समारंभात गाणी आणि डान्स यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखीच वाढते. आजकाल नवरदेव आणि नवरीदेखील स्वतःच्या लग्नात डान्स करताना दिसतात. सध्या अशाच एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक नवरदेव आपल्याच वरातीत बिनधास्त डान्स करत आहे. नवरदेवाने त्याच्या नृत्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

तुम्ही लग्नात सामान्य फिल्मी नृत्य करणारे लोक पाहिले असतील. वरातीमध्येही लोक सामान्यतः फिल्मी शैलीत नाचताना पाहिले असतील. पण, या व्हिडीओमध्ये नवरदेवाने ब्रेक डान्स करीत अशा काही हालचाली केल्या आहेत, ज्या सरावाशिवाय करताच येत नाही. त्याचा हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

व्हिडीओमध्ये वराने केलेला नृत्य करण अर्जुन या चित्रपटाच्या थीमवर बनवलेल्या रॅप गाण्यावरील आहे. त्यामध्ये सुरुवातीला संवाद ऐकू येतो, “ठाकूर तो गयो!” यामध्ये, डिस्को बीट्समध्ये वराने मान आणि खांद्याच्या अशा काही हालचाली दाखवल्या की, त्या कोणाचेही लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेशा आहेत. व्हिडीओच्या शेवटी तर वराचा स्वॅग पाहण्यासारखाच असतो.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @the_indore_update_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “वर स्वतःला रोखू शकला नाही.”, त्याला फक्त नऊ तासांत ३६ हजार व्ह्युज मिळाले आहेत. इमोजीसह अनेकांनी व्हिडीओला पसंती दिली आहे. लोकांना विशेषतः वराचा आत्मविश्वास आवडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

व्हिडिओला लाईक्स देण्यासोबत काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली, “मायकल जॅक्सनचा आत्मा वरात शिरला आहे.”, दुसऱ्या युजरने लिहिले, “भाऊ, असा आत्मविश्वास कोणालाच नसावा.” तिसऱ्या युजरने लिहिले, “या काळात तर आमच्या वरातीतील लोकांना मारहाण झाली असती.” त्याच वेळी एका युजरने वराला “टारझन” म्हटले, तर काही नेटकरी नवरदेवाचा डान्स पाहून कौतुक करत आहेत.