अशी क्वचितचं एखादी व्यक्ती असेल जी व्हॉट्सअॅपचा वापर करत नसेल. व्हॉट्सअॅपवर अनेकदा खोटे मेसेजही आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक ऑफरचा मेसेज व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होत आहे. या मेसेजमध्ये Heineken ही कंपनी लॉकडाउनमधअये मोफत बीअर देत असल्याचं सांगण्यात येत आहे. या मेसेजमध्ये या कंपनीकडून मोफत बीअरच्या दावा करत एक सर्व्हे करणारा फॉर्म भरण्यास सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर Heineken या कंपनीकडून हा मेसेज खोटा असून स्कॅम असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच अशी कोणतीही ऑफर कंपनीकडून देण्यात येत नसल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. असे स्कॅम सामान्य आहेत आणि या फिशिंग अॅटॅक्सचा वापर ग्राहकांचा डेटा चोरण्यासाठी होतो. याद्वारे स्कॅमर्स कमाईदेखील करतात.
कंपनीकडून ट्विटरवर माहिती
सध्या व्हायरल होणारा हा मेसेज कंपनीला टॅग करून एका युझरनं त्याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर कंपनीनं त्याला रिप्लाय देत तो मेसेज खोटा असल्याचं सांगितलं. हा एकप्रकारचा स्कॅम आहे. कृपया या लिंकवर क्लिक करू नका. ही माहिती आमच्या निदर्शनास आणण्यासाठी धन्यवाद, असा रिप्लाय कंपनीकडून देण्यात आला आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर युझरला एका खोट्या संकेतस्थळावर नेण्यात येतं. तसंच त्यानंतर त्याच्याकडून त्यांचे डिटेल्स भरून घेतले जातात.