समुद्र जग खूप मनोरंजक आहे. हे रहस्यमय आणि सुंदर जग पाहण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. डाइव्ह करणारे अनेकदा समुद्राचा शोध घेण्यासाठी अनेक मीटर खोलवर जातात. मात्र या थरारक अनुभवादरम्यान काहीवेळा त्यांना भीतीदायक प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. अशीच घटना एका डाइवर आणि त्याच्या मैत्रिणीसोबत घडली. एक पांढरी व्हेल त्यांच्या समोर आली.

नक्की काय झालं?

मिच ब्राउन वय वर्ष २७ आणि मैत्रीण याना जियान वय वर्ष २४ ताहिती मध्ये गेल्या वर्षी एका घाबरून सोडणाऱ्या घटनेचा सामना करावा लागला. व्हेल बोट टूर दरम्यान एक बेबी व्हेल सह त्यांची टक्कर झाली. २ आठवड्याची बेबी व्हेल अचानक यानासोबत पोहायला लागले. त्याचा आकार आणि पाण्यात पोहण्याचा वेग यानाला व्हेलच्या अगदी जवळ आणलं. याना त्याला जवळपास धडकणार होती.

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

बेबी व्हेल यानाच्या डोक्याजवळ आली

गेल्या सप्टेंबरमध्ये, मिच ब्राउन आणि याना मूरिया व्हेल-स्पॉटिंग बोट टूरसाठी गेले होते. छायाचित्रकार मिच यांनी सांगितले की, तो आणि याना पाण्याच्या वर तरंगत होते. मग आम्हाला एक मोठी व्हेल दिसली, जी खाली आरामात पोहत होती. पण बेबी व्हेल आमच्याकडे आली. बेबी व्हेल इतकी जवळ आली की तिचे तोंड यानाच्या डोक्यावर आदळणार होते. घाबरलेल्या यानाला त्या काळात कशी प्रतिक्रिया द्यायची हे कळत नव्हते.

(हे ही वाचा: तो कुत्रा आहे असं वाटतंय? मग हा Viral Video शेवटपर्यंत बघाचं!)

असा वाचला जीव

जेव्हा यानाने तिच्या पायांऐवजी हाताने पोहणे सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच ती व्हेलपासून दूर जाऊ शकली. जर ती तिच्या पायाने पोहली असती तर व्हेल माशाशी टक्कर झाली असती. त्यामुळे तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. बेबी व्हेलच्या भीतीने, यानाने खाली डुबकी मारण्याचा आणि पाण्याच्या पृष्ठभागावर परत जाण्याचा निर्णय घेतला.

(हे ही वाचा: Viral Video: लग्नात नवरदेव करत होता डान्स तेव्हाच, नवरीने काढली चप्पल आणि…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
(Image: Mitch Brown/SWNS)
(Image: Mitch Brown/SWNS)

परत आलेल्या यानाने व्हेलचा बळी होण्याचे थोडक्यात टाळले. बराच वेळ पोहल्यानंतर, बेबी व्हेल पुन्हा तळाशी गेली.