Man Gets Wife Married To Lover: १९९९ चा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’ च्या कथानकाचं रिअल लाईफ व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिहारच्या नवादा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला प्रियकरासह रंगेहात पकडलं होतं. त्यानंतर रंगलेलं नाटक सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एका जोडप्याचं शिव मंदिरातील लग्न पाहायला मिळतंय. व्हिज्युअलमध्ये महिलेचा प्रियकर तिच्या कपाळावर सिंदूर (कुंकू) लावताना दिसत आहे तर आजूबाजूचे लोक मोबाइल फोनवर हे रेकॉर्ड करत आहेत. व्हिडिओमध्ये ती महिला असह्यपणे रडताना दिसत आहे. तर या व्हिडिओमध्ये अन्य एक व्यक्ती सुद्धा आहे जी सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. नेमकं हे प्रकरण काय चला पाहूया…

इंडिया टुडेच्या माहितीनुसार, सदर प्रकार बिहारमध्ये घडला असून. पती कामानिमित्त बाहेर असताना एक महिला रात्री उशिरा प्रियकराला त्याच्या घरी भेटायला गेली होती. यापूर्वीही तिने अशाच प्रकारे प्रियकराची भेट घेतली होती पण यावेळेस मात्र या जोडप्याला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रंगेहात पकडले. यानंतर कुटुंबियांकडून त्या माणसाला मारहाण केली गेली इतकेच नाही तर दोघांना ओलीस ठेवण्यात आले. संतप्त ग्रामस्थांनी या जोडप्याला गाव सोडण्यास सुद्धा सांगितले.

हे ही वाचा<< “मीटिंगच्या नावे हॉटेलमध्ये रात्रभर..” ज्योती मौर्य यांच्या नवऱ्याने केले ‘हे’ मोठे दावे; म्हणाला, “तिच्यामुळे ट्रेनखाली…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महिलेच्या पतीला परत येऊन घटनेची माहिती मिळताच त्याने जोडप्याला मंदिरात नेले आणि पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. महिलेचा प्रियकरही विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. यावेळेस महिला जोरजोरात रडत आपल्या प्रियकराशी लग्न करते. महिलेचा पती जरी व्हिडिओमध्ये लग्नाला समंती दर्शवत असला तरी त्या महिलेच्या प्रियकराच्या पत्नीची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. संबंधित क्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली आहे, मात्र अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, असे समजतेय.