scorecardresearch

Premium

Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये थिरकली महिला, बेली डान्सचा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलेनं बेली डान्स करून सर्व प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला. व्हिडीओ होतोय व्हायरल.

Woman Belly Dance Video viral
महिलेनं ट्रेनमध्ये केला बेली डान्स. (Image-Twitter)

Woman Belly Dance In The Train : मुंबई लोकल ट्रेनमध्ये बेली डान्स करणाऱ्या एका महिलेचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रेनमध्ये घडणाऱ्या मजेशीर गोष्टी व्हिडीओंच्या माध्यमातून नेहमीच समोर येत असतात. पण या महिलेचा बेली डान्स पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सेंडहर्स्ट रोड आणि मस्जिद स्टेशनदरम्यान ट्रेनच्या प्रवासात शूट केल्याचं बोललं जात आहे. महिलेचा बोल्ड अंदाजातील व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगेवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांचं लक्षही वेधून घेतलं आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला लोकल ट्रेनमध्ये अशाप्रकारे डान्स करते, जे पाहून सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. महिलेनं केलेला डान्स अश्लील असल्याचं लोकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून म्हटलं आहे. महिलेचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्यावर लोकांनी सोशल मीडियावर मुंबई पोलिसांना टॅग करणं सुरु केलं. तसंच हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सेंट्रेल रेल्वेलाही टॅग करण्यात आलं आहे.

Gautami Patil Dance
गौतमी पाटील नऊवारीत नाही तर सहावारी साडीत थिरकली! व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
Mathura EMU Train Accident News in Marathi
Mathura Train Accident : मथुरा रेल्वे स्टेशनवर झाला अपघात! रुळावरून थेट प्लॅटफॉर्मवर चढली ट्रेन, पाहा व्हिडीओ
A young man's stunts in a running train Thrilling video from Mumbai local is going viral
जीवघेणा खेळ! धावत्या ट्रेनमध्ये तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
Mumbai local train Video group of people sing a bhajan song and keep tradition video goes viral on social media
Mumbai Video : मुंबई लोकलमध्ये जपताहेत भजनाची परंपरा, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

नक्की वाचा – चिमुकल्याने कधीच वाढदिवस साजरा केला नाही! पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिलं मोठं सरप्राईज, Video पाहून रडू येईल

इथे पाहा व्हिडीओ

लोकल ट्रेनमध्ये अनेक प्रकारच्या विचित्र घटना घडत असतात. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे ऐवजही लंपास करतात. पण महिलेच्या डान्सचा हा बोल्ड व्हिडीओ पाहून लोकांना धक्काच बसला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारचे कृत्य करण्यास बंदी असते, तरीही काही लोक अश्लील डान्स करून रील्स बनवण्याचा प्रयत्न करतात. महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman did belly dance in mumbai local train people gives angry reaction on viral video nss

First published on: 20-09-2023 at 13:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×