Woman fell from stairs video:सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक हल्ली काहीही करू लागले आहेत. रीलवर मिळणाऱ्या लाइक्स आणि कमेंट्सची नशा अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना लागली आहे. मग यामुळे काहीही करावं लागलं तरी चालेल. अगदी त्यांच्या जीवावर बेतलं तरीही…

सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात ही महिला चक्क पायऱ्यांवरून घसरत घसरत खाली कोसळते. पण, नंतर कळतं की, हे फक्त एका व्हिडीओसाठी आहे. महिलेचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नेमकं काय घडलं आहे ते जाणून घेऊ…

हेही वाचा… अशी वेळ कोणावर येऊ नये! पाणीपुरी विक्रेत्याचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका महिलेला रेल्वेस्थानकाच्या पायऱ्यांवरून उतरत असताना अचानक चक्कर येते. चक्कर आल्याने ती तिथेच खाली कोसळते आणि पायऱ्यांवरून पडत खाली येते. खाली पडत असताना एक आजोबा तिची मदत करू पाहतात; पण ते शक्य होत नाही. तेवढ्यात समोरून एक माणूस येतो आणि तिला मदत करतो. एवढं सगळं झाल्यानंतर हे लक्षात येतं की, तिनं हे फक्त एका रीलसाठी केलं आहे. त्या माणसानं मदत करताच ती महिला स्वत:च उठून बसते आणि हसायला लागते. यावरून हा व्हिडीओ केवळ एक प्रँक म्हणून शूट केला होता हे लक्षात येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @hey_arti_01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावरून त्या महिलेचं नाव आरती आहे, असं लक्षात येतंय. “मला खूप जास्त लागलं आहे “असं कॅप्शन या व्हिडीओला या महिलेनं दिलं आहे. तर दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला तब्बल ९०.९ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. यादरम्यान इन्स्टाग्रामवर या महिलेचे अशाच प्रकारचे प्रँक व्हिडीओ दिसले आहेत, जे तिने सार्वजनिक ठिकाणी शूट केले आहेत.

हेही वाचा… चालत्या स्कूटरवरून खाली खेचलं अन्…, भररस्त्यात दोन विद्यार्थीनींचा राडा, एकमेकींच्या अंगावर बसून केली मारहाण, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करीत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “यांच्यासारख्या लोकांमुळे इतर प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतं. सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ बनवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.” तर दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “या लोकांमुळे माणसांचा माणसांवरील विश्वास उडून जाईल आणि जेव्हा खरंच कोणाला कोणाची गरज असेल तेव्हा त्यांच्या मदतीला कोणी नसेल.” तिसऱ्यानं “प्रसिद्ध होण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातील”, अशी कमेंट केली.