ऑनलाइन अनेक वेबसाइट्स आणि ॲप्स आहेत जिथे तुम्ही तुमच्या जुन्या वस्तू सहज विकू शकता आणि विकत सुद्धा घेऊ शकता. या वेबसाईट्सवर तुम्हाला जी वस्तू विकायची आहे त्याचा एखादा फोटो पोस्ट करून किंमत लिहावी लागते. काही जण या वस्तू आधीच जास्त किमतीत पोस्ट करतात. कारण त्यांना अंदाज असतो की, समोरची व्यक्ती थोडे का होईन पैसे कमी करूनच वस्तू विकत घेणार. तर सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे.एक महिला तिच्या घरातील प्लाटिकचे फिल्टर ऑनलाईन विकण्यासाठी पोस्ट करते ज्याची किंमत पाहून तुम्ही थक्क व्हाल.
अनेकदा घर साफ करताना आपण प्लास्टिकच्या वस्तू फेकून देतो. तर बंगळुरूच्या एका महिलेला तस न करता ही वस्तू वेबसाईटवर विक्रीसाठी पोस्ट केली.महिला बंगळुरू सोडून दुसऱ्या शहरात रहायला जात असते. तर तिला तिच्या घरातील सामान विकायचे असते. महिलेला तिच्या घरातील दोन प्लास्टिक पाण्याचे कॅन विकायचे असतात. म्हणून ती ‘फ्लॅट अँड फ्लॅटमेट्स बंगळुरू’ ग्रुपवर याची जाहिरात शेअर करते. महिलेने शेअर केलेली मजेशीर पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.
पोस्ट नक्की बघा :
पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, दुसऱ्या शहरात शिफ्ट होणार असते म्हणून महिला तिच्या घरातील सामान विकण्यास काढते. इथपर्यंत पण ठीक आहे. पण, दोन प्लास्टिक पाण्याचे कॅनची किंमत महिला चक्क ४१,००० रुपये ठेवते ; जे पाहून तुम्हीसुद्धा डोक्याला हात लावाल. महिलेने जुन्या वस्तूसाठी दिलेल्या या किंमतीमुळे सोशल मीडियावर अनेक मिम्स येऊ लागले.
सोशल मीडियावर ही पोस्ट @VandanaJain_ या एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. अनेक जण ही पोस्ट पाहून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. एक युजर ही किंमत पाहून म्हणतोय की, मी कित्येकवेळा असे कॅन निशुल्क देऊन टाकले आहेत. तर दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, तुम्ही याचे पेमेंट इएमआयवर (EMI) स्विकाराल का ? , तर तिसऱ्या युजरने काही डिस्काउंट मिळेल का ? आदी अनेक मजेशीर कमेंट केलेल्या तुम्हाला पोस्टखाली दिसून येतील.