Shocking video: सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. पाण्याच्या ठिकाणी मस्ती करू नका, असे अनेकदा सांगितले जाते; मात्र तरीही तरुणाई ऐकत नाही. मग साहजिकच कित्येकदा अशा व्यक्तींना प्रत्यही जीवालाही मुकावं लागतं. एका तरुणाला समुद्रातील बोटीवरचा त्याचा हाच हलगर्जीपणा अंगलट आला आहे. एक चूक अन् या तरुणाबरोबर काय घडलं तुम्हीच पाहा. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काही मंडळींना स्टंटबाजीची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस त्यांच्या अंगाशीसुद्धा येते. प्रसिद्धी मिळविण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार या तरुणासोबत घडला आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण बोटीवर रिल्स काढायच्या नादात थेट पाण्यात जाऊन पडला. तो रिल्स काढण्यासाठी बोटीवर चढला होता यावेळी त्याचा एक मित्र बोटीच्या लांबून त्याचा व्हिडिओ काढत होता. यावेळी तो बोटीवर मागे पाहून चालत होता. तो पुढे न पाहता कॅमेऱ्यात बघून अॅक्टिंग करायला जातच होता. तेवढ्यात त्याचा तोल जातो आणि तो पाण्यात पडतो.  कुठेही असे जीवावर बेतणारे स्टंट करणाऱ्या लोकांना नक्कीच कधी ना कधी धडा मिळतो. त्याबाबतची बऱ्याचदा आपल्याला समोर आलेल्या व्हिडीओंद्वारे मिळत असते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की, या तरुणाला जबर मार देखील बसला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर ranchi_explores नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रसिद्धीझोतात येण्यासाठी तरुणाई स्टंट करताना दिसून येते. दिवसेंदिवस निरनिराळे स्टंट करण्याची जणू क्रेझच झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसून येतात.