Viral video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रील माफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत लोक कार आणि बाइकवर धोकादायक स्टंट करतात. यावेळी ते केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीत, तर असे लोक इतरांच्या जीवाशीही खेळतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चालत्या बाईकच्या सीटच्या खाली बसला आहे. रील बनवण्यासाठी तरुणाची ही स्टंटबाजी सुरु आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहून तुमचाही श्वास थांबेल.

काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत.

या व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण रस्त्यावर वेगात दुचाकी चालवत आहे. मात्र, केवळ अति वेग नाही, तर तो विनाहेल्मेट आणि कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय स्टंट करताना दिसतोय. धक्कादायक म्हणजे तो दुचाकीच्या एका बाजूला बसत स्टंट करत आहे. स्टंटची दृश्यं पाहून अंगावर काटा येतो. इतकं धाडस की क्षणभरही चुकलं असतं, तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

पाहा व्हिडीओ

हा घडलेला प्रकार नक्की कुठल्या शहरातील आहे ते अद्याप समजलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rareindianclips नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “अशा लोकांना फक्त पोलीस लाठीमारच सुधारू शकतात.” तर आणखी एकानं, “जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला विचारा आयुष्याची किंमत” अशी प्रतिक्रिया दिली आहे.