Shocking video: पंजा लढवणे हा हातांच्या कुस्तीचा प्रकार आहे. हा खेळ रोमांचक तितकाच विलक्षण आहे. खेळाडू हे स्पर्धेसाठी ते दिवसरात्र अथक मेहनत घेत असतात. अशाच स्वप्नामागे धावणा-या एका खेळाडूला मोठी किंमत चुकवावी लागली आहे.गेल्या काही वर्षांमध्ये आर्म रेसलिंग हा खेळ प्रचंड लोकप्रिय झाला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आर्म रेसलिंगच्या भव्य स्पर्धा भरवल्या जातात. कुस्ती, बॉक्सिंगप्रमाणेच या खेळातही खेळाडू आपली शारीरिक ताकद दाखवतात. पण या खेळात इतर खेळांप्रमाणेच गंभीर इजाही होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील.

आर्म रेसलिंग हा खेळ म्हणजेच पंजा लढवणे. हा खेळ अनेकजण आवडीन खेळतात. मात्र या खेळासाठी जास्त ताकद आणि टॅक्टचा वापर महत्त्वाचा आहे. मात्र थोडीशीही चूक एखाद्याला मोठी दुखापत करु शकते. एका तरुणाचा आर्म रेसलिंग करताना हातच मोडला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पंजा लढवण्याची स्पर्धा सुरु असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. टेबलच्या दोन्ही बाजूला खुर्चीवर दोन मुलं पंजा लढवण्यासाठी बसले आहेत. मग दोघेही हात वर घेऊन पंजा लढवतात. या दरम्यान कुणालाही कल्पना नसताना पंजा लढवताना एकाचा हात पूर्णपणे मोडतो. बाजूला असलेले मुलंही शॉक होतात. त्यांनाही काय करायचं सुचंत नाही. सगळे डोक्याला हात लावताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘हे’ VIDEO मध्ये कैद झालं नसतं तर विश्वास बसला नसता; मॉलमध्ये जमीन फाटली अन् महिलेसोबत घडलं धक्कादायक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे खेळादरम्यान दुखापत, मृत्यू, धक्कादायक घटना समोर येत असतात. त्यामुळे निमय, फिटनेस आणि सगळ्या गोष्टी माहित असल्याविषयी खेळणं जीवावर बेतू शकतो. हा व्हिडीओ @gharkekalesh या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ पाहून युजरही शॉक झाले आहेत. नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत.