Young Women Fight video viral: आजकाल लहान सहान गोष्टींवरून अनेकांचे वाद होत असतात. कधी कधी या वादाचं रुपांतर मारामारीत होतं आणि मग यात काहींना दुखापत होते. काही जण कधी कोणत्या गैरसमजामुळे, तर कधी मुद्दाम भांडणासाठी कारण शोधून काढतात. या भांडणात अनेक जण आपापल्या मर्यादा ओलांडतात आणि यामुळे काही भांडणं मारहाणीपर्यंत जाऊन पोहोचतात.

आपण सोशल मीडियावर अनेकदा तरुणांचे, पुरुषांचे तसेच महिलांचेदेखील वाद पाहिले असतील. पण, तरुणींची भांडणं मारामारीपर्यंत जाताना तुम्ही कधी पाहिलीयत का? सध्या तरुणींचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात दोन तरुणी एकमेकींशी वाद घालताना दिसतायत. इतकंच नव्हे तर हे भांडण इतकं वाढलं की, दोघी एकमेकांच्या जीवावरच उठल्या. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…

हेही वाचा… अरे जरा तरी लाज बाळगा! मादी श्वानाला शौचालयात नेलं अन्…, वृद्धाच्या विकृत कृत्याचा VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडीओमध्ये भररस्त्यात दोन तरुणी एकमेकांशी भांडताना दिसतायत. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, या तरुणींचा फक्त वादच झाला नाही तर यानंतर या वादाचं रुपांतर भांडणात झालं. या मारामारीत दोघी एकमेकींना कानाखाली मारत एकमेकांची केसं ओढताना दिसल्या. वाद इतका पेटला की, तिथे आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांनी यात हस्तक्षेप केला आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. या भांडणामुळे आजूबाजूला गर्दी जमली आणि हा चर्चेचा विषय ठरला; तरी हा वाद नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @hey_paban_11 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला एक मिलियन व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… ट्रकने धडक देताच दुचाकीने घेतला पेट, माणूस आगीत होरपळला अन्…, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “निर्लज्जासारखी मारामारी केली आणि व्हिडीओही पोस्ट केला.” तर दुसऱ्याने “मग यातलं कोण जिंकलं” असं विचारत कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “आता एकमेकींचा जीव घेतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही. हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.