News Flash

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाची दमदार सुरुवात

प्रोविड्न्स येथे भरलेल्या बृहन महराष्ट्र मंड्ळाच्य १६व्या अधिवेशनाची दिंडी,भावगीत लावण्या यांच्या साथीने दमदार सुरुवात झाली. बीएमएम चे अध्यक्ष श्री आशीष चौघुले यांनी सर्वांचे स्वागत केले.

| July 6, 2013 05:12 am

प्रोविड्न्स येथे भरलेल्या बृहन महराष्ट्र मंड्ळाच्य १६व्या अधिवेशनाची दिंडी,भावगीत लावण्या यांच्या साथीने दमदार सुरुवात झाली. बीएमएम चे अध्यक्ष श्री आशीष चौघुले यांनी सर्वांचे स्वागत केले. बीएमएम या संघटनेची आणि तिच्या उपक्रमाची थोडक्यात ओळख करून दिली.  अमेरिका , कॅनडा याशिवाय दहा देशातून ३५०० लोक यंदा या अधिवेशनाला आले आहेत. प्रमुख पाहुणे महेश मांजरेकर यांनी “एवढ्या मोठ्या संख्येने भारताबाहेर मी प्रथम मराठी मंडळी एकत्र आलेली बघतो आहे; याचा मला अभिमान आहे , मराठीपण कुठे जपले जात असेल तर ते भारताबाहेर, परदेशात अमेरिकेत!” असे सांगून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रमुख वक्ते डॉ. बाळ फोंडके, न्यू यॉर्क चे काउन्सेलर जनरल श्री ज्ञानेश्वर मुळे, कॉसमॉस बॅंकेचे जयंत शाळिग्राम ,न्यू इंग्लंड मराठी मंडळाचे बाळ महाले यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते. यजमान न्यू इंग्लंड मंडळाने दिंडी,भावगीत आणि लावण्या याचा समावेश असलेला उद्घाटनाचा कार्यक्रम सादर केला. लहान मुलांसह सर्व स्थानिक कलाकारांचा उत्साह आणि त्यांची तयारी कौतुकास्पद होती.

दरवर्षी अधिकाधिक चांगले होत गेलेले आयोजन अशी परंपरा या अधिवेशनाने कायम ठेवली. यंदाच्या अधिवेशनाचे आयोजन, जेवण आणि उपस्थितांची व्यवस्था यात कोठेही कसर नव्हती. स्वयंसेवक आणि ठिकठिकाणी लावलेले माहितीचे फलक यामुळे सर्व रसिकांना कार्यक्रमाची माहिती आणि सर्वप्रकारची मदत लवकर मिळत होती. भारतातून आलेले फॅमिली ड्रामा हे नाटक, सौमित्र व वैभव जोशी यांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम यांना प्रेक्षकांचा उत्त्म प्रतिसाद मिळाला. कॉसमॉस बॅंकेने प्रायोजित केलेल्या बीएम एम २०१३ सारेगम स्पर्धेमध्ये कॅनडाचे दोघे- रवी दातार विजेता , समिधा जोगळेकर उपविजेती ठरली. प्रसन्न आढावकर याला तिसरे पारितोषिक मिळाले. भारतातून आलेल्या कलाकारांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कमलेश भडकमकर आणि त्यांच्या वाद्यवृंदाने विशेष दाद मिळवली. पद्मश्री पद्मजा फेणाजी जोगळेकर आणि राहूल देशपांडे हे या स्पर्धेचे परीक्षक होते. रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. अधिवेशनाच्या दुस-या दिवसाच्या भरगच्च वेळापत्रकाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2013 5:12 am

Web Title: bmm convention event first day
टॅग : Loksatta,Marathi News
Next Stories
1 प्रॉव्हिडन्स शहर ‘मराठी’मय
2 आली घटिका समीप : बीएमएम अधिवेशनासाठी प्रॉव्हिडन्स सज्ज
3 अमेरिकेतील मायमराठीचा वारकरी!
Just Now!
X