इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आठ संघांनी एकूण २७ खेळाडूंना आपल्या संघांमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यापैकी आठ खेळाडू हे परदेशी आहेत. चेन्नई सुपरकिंग्स, मुंबई इंडियन्स, केकेआर आणि दिल्ली कॅपिटलर्सने प्रत्येकी चार खेळाडू रिटेन केले आहेत. तर आरसीबी, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने प्रत्येकी तीन खेळाडून रिटेन केलेत. सर्वात कमी रिटेनर हे पंजाब किंग्स संघात आहेत. पंजाबने केवळ दोनच खेळाडू रिटेन केलेत.

आगामी म्हणजेच २०२२ च्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएलच्या) पर्वासाठी संघांनी कोणते खेळाडू रिटेन करणार आहेत याची यादी जाहीर केलीय. मंगळवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये चेन्नई सुपर किंग्सने आपल्या चार खेळाडूंना रिटेन केलं आहे. सीएसकेने रिटेन केलेल्यामध्ये कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा समावेश आहे. मात्र विशेष गोष्ट म्हणजे कर्णधार धोनीपेक्षा चेन्नईच्या व्यवस्थापनाने जडेजासाठी अधिक पैसे मोजले आहेत. त्यामुळेच आजपर्यंत चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू अशी ओळख असणाऱ्या धोनीची ही ओळखही आता पुसली गेलीय. रविंद्र जडेजा आता चेन्नईसाठीचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तसेच रिटेन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आतापर्यंत पहिली पसंती असणारा धोनी यंदा मात्र चेन्नईच्या संघाची पहिली पसंती नव्हता.

नक्की पाहा ही यादी >> IPL 2022: अनपेक्षित, अनाकलनीय… दमदार कामगिरीनंतरही संघांनी या खेळाडूंना केलं करारमुक्त; अनेक दिग्गजांचा समावेश

चेन्नईच्या संघाने आधी रविंद्र जडेजाची निवड रिटेन केला जाणारा फर्स्ट चॉइस म्हणून केली. त्यानंतर त्यांनी धोनीला संघात स्थान दिलं. चेन्नईच्या संघाने महेंद्र सिंग धोनीला १२ कोटींच्या किंमतीला रिटेन केलं आहे. तर जडेजासाठी चेन्नईने १६ कोटी मोजलेत. म्हणजेच जडेजाला संघात घेण्यासाठी चेन्नईने धोनीच्या तुलनेत चार कोटी रुपये अधिक मोजले आहेत. पण यंदाच्या आयपीएलमध्ये जडेजा हा असा एकमेव खेळाडू नाही जो धोनीपेक्षा जास्त पगार घेणार आहे. धोनीपेक्षा अधिक मानधन घेणारे तब्बल पाच खेळाडू या रिटेन पॉलिसीअंतर्गत वेगवेगळ्या संघांनी कायम ठेवलेत. या पाचपैकी चार जण हे वगेवगेळ्या संघाचे कर्णधार आहेत. जाणून घेऊयात कोण आहेत हे खेळाडू…

१) दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला १६ कोटी देऊन रिटेन करण्यात आलंय. मागील पर्वापेक्षा पंतला यंदा एक कोटी रुपये कमी देण्यात आले आहेत. मागील पर्वासाठी त्याला १७ कोटी मिळाले होते.

२) मुंबई इंडियन्सच्या संघाबद्दल सांगायचं झाल्यास कर्णधार रोहित शर्माला १६ कोटींची किंमत मोजून रिटेन करण्यात आलंय. मागील पर्वात रोहित शर्माला १५ कोटी रुपये देण्यात आले होते. यंदा त्याला एक कोटींचा फायदा झालाय.

३) आरसीबीने विराट कोहलीला १५ कोटींना रिटेन केलं आहे. विराट आता संघाच्या कर्णधारपदी नसणार तरी तो संघातील सर्वात महागडा खेळाडू आहे. मागील पर्वामध्ये विराटला १७ कोटी रुपये देण्यात आले होते. म्हणजेच यंदा विराटला दोन कोटींचा फटका बसलाय.

४) राजस्थान रॉयल्सने कर्णधार संजू सॅमसनला १४ कोटींना रिटेन केलं आहे. मागील पर्वात संजू सॅमसनला ८ कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच संजू सॅमसनला एकूण ६ कोटींचा फायदा झालाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) सनरायजर्स हैदराबादने कर्णधार केन विल्यम्सनला १४ कोटी देऊन रिटेन केलंय. मागील पर्वात केनला केवळ तीन कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच यंदा केन विल्यम्सनला तब्बल ११ कोटी रुपयांची वाढ मिळालीय.