वसई: बिहार राज्यात हत्या करून फरार झालेल्या आरोपीला नायगाव पोलिसांनी चिंचोटी येथून अटक केली आहे.सुरज उमेश सिंग (३२) असे या अटक आरोपीचे नाव आहे.बिहार राज्यातील रोहा पोलीस ठाणे हद्दीतील बारापाण्डेया या गावात एका युवकाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी बिहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्येनंतर हा आरोपी महाराष्ट्रात

 वसईतील चिंचोटी परिसरात आल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली होती. त्यांनी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ २ च्या उप आयुक्तांना कळविले होते. त्यानंतर उपयुक्तांनी नायगाव पोलीस ठाण्याला सूचना देऊन आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा >>>वीज देयके भरण्याच्या नावाखाली अडीच लाखांचा गंडा

त्यानुसार नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आरोपीला चिंचोटी पाटील पाडा येथून अटक केली आहे. सुरज उमेश सिंग असे या आरोपीचे नाव असून१६ वर्षा पूर्वी जुन्या भांडणाचा मनात राग धरुन मौजे बरडकी खारांकला, सहर पोलीस ठाणे राज्य बिहार या गावचा मुखीया नामे राजकुमार कानु व त्याचा मित्र नामे यादव यांचा दुहेरी खुन केला असल्याची कबुली दिली आहे. या आरोपीला रोहा पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सदरची कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे) सागर टिळेकर , पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश केकान, रोशन देवरे व त्यांच्या पथकाने केली आहे.