भाईंदर :- सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सनातन धर्माचा अपमान करणे असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सदर वकील राकेश कुमार यांनी हे कृत्य सनातन धर्मासाठी केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेवर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनीही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “सनातन धर्म हा संयम, प्रेम आणि सन्मान यांची शिकवण देणारा धर्म आहे. मात्र, त्या नावाखाली असे कृत्य करून सनातन धर्माचा अपमान करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान झाला आहे.”असे त्यांनी सांगितले आहे

प्रामुख्याने “केंद्र सरकार देशात कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. या घटनेची मी तीव्र निंदा करतो आणि संबंधित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करतो.”