लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात डेंगू आणि मलेरिया आजाराने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मागील महिन्याभरात बाधित रुग्ण संख्येत चार पटाहून अधिकची वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेकडून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Mysterious flu like Disease X
आणखी एका महासाथीचा धोका? आतापर्यंत ७९ जणांचा मृत्यू; काय आहे ‘Disease X’?
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
30 bed updated ward at Thane District Hospital for treatment of Zika patients Mumbai print news
झिका रुग्णांच्या उपचरासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात ३० बेडचा अद्यावत कक्ष !
about symptoms treatment vaccine for Bleeding eye disease
जगावर नव्या विषाणूजन्य आजाराचे संकट? डोळ्यातून रक्तस्राव होणाऱ्या नव्या आजारामुळे भीती का निर्माण झाली?
Insurance, dengue, maleria, Insurance policy,
डेंग्यू, हिवतापासाठी आता ५९ रुपयांत विमा! देशातील सर्वांत मोठ्या वित्ततंत्रज्ञान कंपनीची योजना
hiv inceased by 75 percent in young people
एचआयव्ही बाधितांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक
air quality in Thane district is at poor level.
जिल्ह्यात हवेची गुणवत्ता मध्यम; तर खासगी हवेच्या निर्देशांकानुसार हवेची गुणवत्ता वाईट
Doctors are also afraid of the swine flu vaccine Nagpur news
‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंधात्मक लसीबाबत डॉक्टरांमध्येही भीती…आरोग्य विभाग…

मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फ़त शहरात डेंगू व मलेरिया सारख्या साथीच्या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून विविध स्वरूपाच्या उपाय योजना आखण्यात येतात. यात प्रामुख्याने औषध फवारणी, पाणी शुद्धीकरण आणि स्वच्छतेचा समावेश आहे.मात्र तरी देखील डेंगू व मलेरिया या साथ रोग आजाराची लागण होऊन बाधित होणाऱ्याचे प्रमाणात पालिका दप्तरी वाढतच असल्याचे दिसून येते.त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

आणखी वाचा-शहरबात : आसपास वावरणारे शैतान…

शहरात जुलै महिन्यात डेंगू आजाराने बाधित असलेल्या संशयित रुग्णांची संख्या ही २२ इतकी होती. मात्र ऑगस्ट महिन्या अखेरीस हा आकडा ६७ वर पोहचला होता.याच प्रमाणे जुलै महिन्यात मलेरिया आजाराचे १९ संशयित रुग्ण असताना हा आकडा ऑगस्ट महिन्यात तब्बल ७२ पोहचला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाता वेळेत उपचार घेण्याचे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी केले आहे.

Story img Loader