वसई: नालासोपारा पूर्वेच्या उमर कंपाउंड मधील एका कारखान्यात थिनर टँकचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत एक कामगार होरपळून जखमी झाला आहे.

नालासोपारा पूर्वेच्या भागात जाबर पाडा, उमर कम्पाउंड, येथे स्कॅच इंजीनियर्स नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात गुरुवारी सकाळी कामगार थिनर टँकचे काम करीत असताना अचानकपणे स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

Pune Fire incidents, Diwali pune, pune,
पुणे : दिवाळीत ६० ठिकाणी आगीच्या घटना
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
thane Bhiwandi attempt to murder
ठाणे: सिगारेट मागितली म्हणून हत्येचा प्रयत्न
fire in thane Diwali
ठाण्यात दिवाळी काळात आगीच्या घटनांमध्ये वाढ, चार दिवसांत ३३ ठिकाणी लागली आग
12 civilians injured in grenade attack in Srinagar
श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात १२ जखमी; जखमींमध्ये महिला व दुकानदारांचा समावेश
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
Howrah Fire
Howrah Fire : फटाक्यांच्या आतषबाजीत तीन चिमुकल्यांचा मृत्यू; ठिणगीने सिलिंडर पेटला अन्…; ऐन दिवाळीत गावावर शोककळा!
Odisha diwali Two dead
ओडिशात आगीच्या भीषण घटना; दोन जणांचा मृत्यू, ५० जखमी

हेही वाचा : भाईंदर : बारावीत ७८% मिळवूनही विद्यार्थिनीची आत्महत्या; ९० टक्के न मिळाल्याने होती निराश

या लागलेल्या आगीत थिनर टँकचे काम करणारा कामगार होरपळून जखमी झाला आहे. याकूब असे या जखमी कामगाराचे नाव असून त्याला रिद्धी विनायका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याकूब हा सुमारे ९० टक्के इतका होरपळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे.