वसई : नालासोपार्‍यात एका पित्याकडून स्वत:च्या २२ वर्षीय मुलीवर शारिरीक अत्याचार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी पिता या मुलीला घरात डांबून सतत तिला मारहाण करून बलात्कार करत होता. पीडित मुलगी क्षयरोगाने आजारी असतानाही हे अत्याचार सुरू होते. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने धाडस करून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी ही २२ वर्षांची असून ती नालासोपारा पश्चिम येथे रहात होती. मागील ३ महिन्यांपासून ती क्षयरोगाने आजारी होती. तिला ११ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर मात्र तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली आहे. पीडित मुलीचे ५४ वर्षीय वडीलच तिच्यावर बलात्कार करून शारिरीक छळ करत असल्याची तक्रार तिच्या आईने नालासोपारा पोलिसांत दिली आहे.

हेही वाचा : वसई : फसवणूक प्रकरणातील फरार ठकसेनाला ३ वर्षांनी अटक

पीडित मुलीवर सतत तिचे वडील बलात्कार करत होते. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देत होते. मुलीला तो बळजबरीने घरात डांबून ठेवत होता. त्यामुळे पीडित आणि तिची आई भीतीपोटी गप्प रहात होते. हे प्रकार सातत्याने वाढत होते. आरोपी पिता मुलीला मारहाण करत होता. या काळात मुलगी गर्भवती झाली होती. त्यावेळी तिचा आरोपी पित्याने बळजबरीने गर्भपातही केला होता.

हेही वाचा : वसई: विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर सट्टेबाजी करणार्‍याला अटक

दरम्यान, पीडित तरुणीला क्षयरोगाची लागण झाल्यानंतरही पित्याचे अत्याचार सुरू होते. मुलीच्या मृत्यूनंतर आईने पोलिसात तक्रार करण्याचे धाडस दाखवले. तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात कलम ३७६(एन), ३५४ (अ) तसते ३४२, ३२२, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पित्याच्या मारहाण आणि शारिरीक अत्याचारामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

हेही वाचा : वसई विरार शहरात फटाक्यांची बेकायदेशीर दुकाने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रथमदर्शनी पीडित मुलीचा मृत्यू हा क्षयरोगाने झाला असल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली आहे. मात्र तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्यावर बलात्कार करणे, विनयभंग करणे, गर्भपात करणे, डांबून ठेवणे आदी तक्रारीनुसार पीडित मुलीच्या पित्यावर विविध कलमाअन्वये गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी पित्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांनी दिली.