नालासोपारा रेल्वे स्थानकातून तीन वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मुलगा भिक्षेकरी कुटुंबातील असून आपल्या कुटुंबीयांसह नालासोपारा परिसरामध्ये आला होता. गुरुवारी दुपारी तो नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या फलाटावर फिरत होता. त्याचवेळी एका जोडप्याने या मुलाला आमिष दाखवून आपल्याजवळ बोलावले आणि त्याचे अपहरण करून फरार झाले.

जोडप्याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल –

मुलाच्या कुटुंबीयांनी दिवसभर शोधाशोध केली. पण मुलगा कुठेही न दिसल्याने त्यांनी रात्री वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात जोडप्याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या मुलाचे अपहरण झाल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे या जोडप्याचा शोध घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅमेऱ्यामध्ये चेहरे स्पष्ट दिसत आहे –

या जोडप्याने मुलाचे अपहरण केल्यानंतर ते बस स्थानकाच्या दिशेने गेले आणि तेथून शहरात गेले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहे. त्यांची ओळख पटवून पुढील तपास सुरू असल्याचे माहिती वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ( गुन्हे) गणपत तुंबडा यांनी दिली.