complaint boxes Schools Vasai : विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाबाहेर तक्रार पेटी लावण्याचा निर्णय केवळ कागदोपत्री राहिला आहे. बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांनी या सूचनेकडे पाठ फिरवली आहे. पोलिसांनी देखील त्याची अंमलबजावणी केलेली नाही.

शहरातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छेडछाड, विनयभंग, बलात्कार आदी घटना घडत आहेत. याशिवाय अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढत चालले आहे. भीती आणि बदनामीमुळे मुली पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी पुढे येत नसतात. अशा मुलींना तक्रार करता यावी यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या बाहेर तक्रार पेटी लावण्याचे निर्देश तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. परंतु ८० टक्कयांहून अधिक शाळा महाविद्यालयात या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.

Clashes erupted between supporters of BJP leader Munna Yadav and his relative Balu Yadav
धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न; आधी आंघोळीचा व्हिडीओ बनवला नंतर…
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
walchand college of engineering
वालचंद महाविद्यालय बळकाविण्यासाठी अडवणुकीचे सत्र
no decision from maha government on mahajyoti withdraw from uniform policy process
‘समान धोरण’मुळे लाखो विद्यार्थी वंचित; ‘महाज्योती’ बाहेर पडल्यानंतर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
mva protest in front of police commissionerate for action on trustee over girl molestation case
महाविद्यालयाच्या आवारात अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी – MVA कडून आयुक्तालयासमोर आंदोलन
Abuse on Girl pune, Pune college Girl Abuse,
पुणे : महाविद्यालयाच्या आवारातच युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा
amravati teachers protest marathi news
अमरावती : “आम्हाला शिकवू द्या, शाळा बनल्या उपक्रमांच्या प्रयोगशाळा”; शिक्षकांचा उस्फूर्त मोर्चा
27 percent of agriculture degree seats vacant
कृषी पदवीच्या २७ टक्के जागा रिक्त; नोकरीच्या संधी, पदभरती घटल्याने विद्यार्थ्यांची पाठ

हेही वाचा – Vasai Crime News : यादवेश विकास शाळेतील बलात्कार प्रकरण, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल

हेही वाचा – भाईंदर खाडीत राज्यातील पहिला डबलडेकर पूल, वर मेट्रो आणि खाली वाहनांसाठी पूल

नालासोपार्‍यातील शाळेतील विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलीने शाळेकडे तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे या तक्रार पेट्या किती आवश्यक आहेत ते दिसून येते असे जाणीव संस्थेचे समनव्यक मिलिंद पोंक्षे यांनी सांगितले. शाळा आणि महाविद्यालयाच्या बाहेर तक्रार पेटीत मुलींनी तक्रार केली तर पोलीस त्यावर कारवाई करणार अशी संकल्पना होती. २०२१ मध्ये वसईच्या तत्कालीन पोलीस उपयुक्तांनी देखील अशा तक्रार पेट्या लावण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्याची देखील अंमलबजावणी झाली नाही.