News Flash

जाड आणि बारीक अशा दोन्ही लोकांनी पहावा असा ‘वजनदार’ चित्रपट

विधि कासलीवाल यांच्या ‘लॅण्डमार्क फिल्म्स’तर्फे सादर होणाऱ्या आगामी ‘वजनदार’ या सिनेमात दोन नायिका आणि एक नायक आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या नायिकांच्या तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा नायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग हा या सिनेमाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांचे आहे. चेतन चिटणीस, समीर धर्माधिकारी हे कलाकारही सिनेमात आहेत. हा सिनेमा येत्या ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X