पुण्यातील लोकप्रिय आणि प्रतिष्ठेचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा ११ ते १४ डिसेंबर दरम्यान येथील महाराष्ट्र मंडळ क्रीडा संकुलाच्या प्रांगणात चार दिवस रंगणार आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. या महोत्सवाद्वारे ‘षड्ज’, ‘अंतरंग’, ‘स्वर शताब्दी’ अशा खास कार्यक्रमांची आनंद रसिकांना घेता येणार आहे . ‘षड्ज’ द्वारे शास्त्रीय संगीतावर आधारित लघुपट पाहण्याची संधी मिळणार आहे. तर ‘अंतरंग’मध्ये दिग्गजांचे विचार ऐकता येणार आहेत. ‘स्वर शताब्दी’ हे विशेष प्रकाशचित्र प्रदर्शन रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.