21 October 2019

News Flash

कल्याणमध्ये रेल्वे रुळावरून घसरली


कल्याण स्थानकात सोमवारी सकाळी लोकल ट्रेन घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणच्या १ ए या प्लॅटफॉर्मवरून ही लोकल सीएसटीच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. प्लॅटफॉर्मपासून काही अंतरावरच ट्रेन रूळांवरून खाली घसरली. त्यामुळे सध्या मध्य रेल्वेच्या स्लो ट्रॅकवरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच डोंबिवली आणि कल्याणदरम्यानची वाहतुकही जलद मार्गावर वळविण्यात आली आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून ट्रेन पुन्हा रूळांवर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कल्याण ते डोंबिवली क्षेत्रातील सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ही वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी किती अवधी लागेल, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या सगळ्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

आणखी काही व्हिडिओ