चीनमधून फैलाव झालेल्या करोना विषाणूने आता भारतातही हातपाय पसरले आहेत. त्यामुळे सरकारने काही ठोस निर्णय घेत नागरिकांना शक्यतो घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच हा विषाणू पसरू नये यासाठी चित्रपट, मालिका, वेब सीरिज, जाहिराती या सगळ्याचं चित्रीकरणही रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हे कलाकार घरी बसून नेमकं काय करतायेत ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात.