उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावरून सध्या राजकारणही तापताना दिसत आहे. खासदार संजय राऊत यांनी हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, असं म्हणत यावर अधिक बोलणं टाळलं. तसंच या प्रकरणात मविआ नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला. त्यावरूनही राऊतांनी फडणवीसांना सुणावलं आहे.