पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर पार्थ पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळात वर्णी लागणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याचदरम्यान पुणे स्टेशन येथील पुणे जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयास अजित पवार यांनी भेट दिली. यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी प्रतिक्रिया दिली.