“ऑलिंपिक भवनासाठी १२ वर्षांपासून प्रयत्न करतोय”; सारथी मुख्यालयाच्या पाहणीवेळी अजित पवारांचं वक्तव्य
पुण्यातील सारथी मुख्यालय आणि शिक्षक भवन या बांधकामाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी सारथी मुख्यालय आणि शिक्षक भवन या बांधकामाची पाहणी करतेवेळी अधिकार्यांना म्हणाले की, “राज्याच्या अनेक भागातून नागरिक या इमारतीमध्ये येणार आहेत. त्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जाव लागू नये. या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही”