Devendra Fadnavis On Manoj Jarange: काल (२७ फेब्रुवारी) विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पडसाद उमटले. अधिवेशनादरम्यान, सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेतून टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, आंदोलन चालू असताना असं काहीतरी अनावधानाने होतं. आमचं बेमुदत उपोषण आहे. त्यावेळी ते अनावधानाने झालं असेल. मी कोणालाही आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नसतील. मी शिव्या दिल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.
Yesterday (February 27) there was a backlash in the budget session of the Legislative Assembly. During the session, there was a huge uproar in the hall. After Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized directly from the Assembly, Manoj Jarange Patil has reacted on this. Manoj Jarange Patil said, something like this happens unintentionally while the agitation is going on. We are on indefinite hunger strike. It must have been unintentional at that time. I would not have cursed anyone on the basis of mother and sister. I apologize if I offended.