पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारमध्ये भाजपाच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत शरद पवार यांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला. “लोकसभा निवडणुकीनंतर छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील,असं शरद पवार म्हणत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे आमच्याबरोबर यावे”, असं मोदी म्हणाले. त्यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात ते बोलत होते.