12 July 2020

News Flash

राज ठाकरे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

देवळाली आणि नाशिक पूर्व या दोन मतदारसंघातील मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी रात्री आयोजित प्रचार सभा निर्धारित वेळेनंतरही सुरू राहिल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूध्द उपनगर

| October 13, 2014 02:02 am

देवळाली आणि नाशिक पूर्व या दोन मतदारसंघातील मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी रात्री आयोजित प्रचार सभा निर्धारित वेळेनंतरही सुरू राहिल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सिडको, गंगापूररोड आणि जेलरोड या तीन ठिकाणी राज ठाकरे यांच्या प्रचार सभा झाल्या. सिडको येथील पहिली सभाच निर्धारित वेळेपेक्षा उशीरा सुरू झाल्याने पुढील दोन्ही सभांना उशीर होत गेला. जेलरोड येथील सभास्थानी राज हे दहा वाजेला दोन मिनिटे बाकी असताना पोहोचले. लगेचच त्यांनी भाषणास सुरूवात केली. सुमारे २५ मिनिटे त्यांचे भाषण सुरू होते. आदर्श आचारसंहितेनुसार रात्री दहा वाजेपर्यंत भाषण संपविणे आवश्यक होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश जाधव यांनी ठाकरे यांच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाची तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 2:02 am

Web Title: violation of code of conduct case against raj thackeray
टॅग Raj Thackeray
Next Stories
1 काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
2 नेत्यांचा मेकओव्हर.. असाही!
3 भाजपला आघाडीची संधी; काँग्रेसची दयनीय अवस्था
Just Now!
X