News Flash

शाहू कारखान्याचा सेंद्रिय खत प्रकल्प

राज्यात ऊस शेती क्षेत्र सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे अनेक कारणांनी ऊस शेती अडचणीत येत आहे,

शाहू कारखान्याचा सेंद्रिय खत प्रकल्प

दयानंद लिपारे dayanand.lipare@expressindia.com

कागलच्या छत्रपती शाहू सहकारी कारखान्याने रासायनिक खताची मात्रा कमी करीत सेंद्रिय खताचा वापर करत ऊस पीक उत्पादनाचा नवा पाठ गिरवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी कारखान्याच्या पूर्वीच्या खत वापरात सुधारणा करून नवीन ‘शाहू समृद्ध सेंद्रिय खत’ तयार केले आहे. रासायनिक खत वापर कमी, सेंद्रिय खताच्या वापराने खर्चात बचत होण्याबरोबरच जमिनीचा कस वाढीस लागणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित अशी त्रिसूत्री यातून साधली जाणार आहे.

शेतमालाचे उत्पन्न वाढले पाहिजे याकडे शेतकऱ्यांचा कटाक्ष असतो. शासनाची पावले आणि नियोजन या दिशेनेच असते. राज्यात बक्कळ पिकणाऱ्या उसाचे क्षेत्र वाढत असताना एकरी उत्पादनात घट होत असल्याचा चिंता आणि चिंतनाचा विषय आहे. यासाठी साखर उद्योगात, संशोधन केंद्रात नानाविध प्रयोग केले जात आहेत. असेच एक आश्वासक पाऊल उचलले आहे ते प्रयोगशीलता, नावीन्य याचे अनुकरण करणाऱ्या कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने. रासायनिक खताची मात्रा कमी करीत सेंद्रिय खताचा वापर करून त्याला जैविक खताची जोड देणारा अभिनव ऊस पीक उत्पादनाचा नवा पाठ गिरवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी कारखान्याच्या पूर्वीच्या खत वापरात सुधारणा करून नवीन ‘शाहू समृद्ध सेंद्रिय खत’ तयार केले आहे. रासायनिक खत वापर कमी, सेंद्रिय खताच्या वापराने खर्चात बचत होण्याबरोबरच जमिनीचा कस वाढीस लागणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित अशी त्रिसूत्री यातून साधली जाणार आहे.

राज्यात ऊस शेती क्षेत्र सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे अनेक कारणांनी ऊस शेती अडचणीत येत आहे, अशा परिस्थितीत ऊ स शेती लाभदायी करण्यासाठी कृषी विभाग, शास्त्रज्ञ, साखर कारखाना, उपR मशील शेतकरी यांनी शाश्वत ऊ स उत्पन्न तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे. याद्वारे घटत चाललेली उत्पादकता वाढविण्याबरोबरच वाढत चाललेला उत्पादन खर्च कमी करण्याचे गणित या नव्या पद्धतीने शेतकऱ्यासमोर मांडले आहे. या पद्धतीमध्ये प्रामुख्याने रोपाद्वारे ऊ स लागवड, पाणी-खतांचा योग्य वापर यावर भर दिला आहे. यासाठी सर्वसाधारणपणे काही मूलभूत तंत्रांचा या पद्धतीत वापर महत्त्वाचा ठरतो. यामध्ये जमिनीत हिरवळीच्या खतांचा सर्वार्थाने वापर करणे, पट्टा पद्धतीचा ऊस लागणीसाठी वापरही तितकाच महत्त्वाचा आहे. आंतरपीक घेणे, बेणे मळ्याचा वापर करून प्रमाणित बियाणे तयार करणे, माती व पाणी परीक्षण, सेंद्रिय तसेच जैविक खतांच्या वापरावर भर देणे या बाबींचा समावेश गरजेचा आहे. याचा विचार करून सभासद शेतकऱ्यांचे उसाचे एकरी उत्पादन तर वाढलेच पाहिजे. शिवाय त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यावरही भर असला पाहिजे. हाच विचार करत सहकारी साखर कारखानदारीमध्ये प्रयोगशीलतेसाठी ओळख असलेल्या कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने पुढचे पाऊ ल टाकले आहे. सर्व प्रकारच्या सुपीकता तसेच निर्यातक्षम शेतीमालाच्या उत्पादनासाठी ‘शाहू समृद्ध सेंद्रिय खत’ तयार केले आहे. त्यावर अभ्यासकांनी पसंतीची मोहर उमटवली आहे. या कारखान्याने काही वर्षांपूर्वी ‘शाहू ह्य़ुमिफॉस’ (फॉसपो कंपोसट) हे ७ घटक असलेले खत तयार केले होते. त्याचे फायदेही दिसत होते. कारखान्याच्या शेती विभागातील शेती अधिकारी, माती परीक्षण अधिकारी यांनी त्यामध्ये आणखी काही सुधारण करण्याची गरज विशद केली. त्याच आढावा घेऊन अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सुधारित खत तयार करण्याला प्रोत्साहन दिले. त्यातून हे नावे खत २० हजारांवर शेतकऱ्यांचा उसाचा मळा फुलवू लागले आहे. त्यातून अर्थकारण बहरणार आहे.

संतुलित खतांची गरज

रासायनिक खतांचा व पाण्याचा अयोग्य अतिरिक्त वापरामुळे जमिनीची उत्पादन क्षमता, जमिनीचा पोत, सुपीकता वुमस’चे प्रमाण कमी होऊ  लागले आहे. जमीन ही जैविक, भौतिक व सेंद्रिय दृष्टय़ा समृद्ध असणे आवश्यक असून जमिनीची उत्पादन क्षमता वाढणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्व प्रकारच्या सूक्ष्म अन्नघटकांचा व सेंद्रिय खताचा संतुलित वापर होणे आवश्यक आहे. याचा विचार करून ‘शाहू ह्य़ुमिफॉस’ खत बनवले. त्यात सुधारण करून शाहू समृद्ध सेंद्रिय खतामध्ये एकूण १३ प्रकारचे घटक समाविष्ट केले आहेत. या खतामध्ये नत्र, स्फूरद, पालाश बरोबरच कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, झिंक, फेरस, इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्याचा तसेच उपयुक्त जैविक सूक्ष्म जिवाणू योग्य प्रमाणात उपलब्ध आहेत. सेंद्रिय खताच्या वापरामुळे पिकांना मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यासह जीवाणूंचाही पुरवठा होतो. शिवाय जमिनीचा पोत सुधारून जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. त्यामुळे एकरी उत्पादनात लक्षणीय अशी वाढ होते. सेंद्रिय खत वापरामुळे रासायनिक खतामध्ये १५ ते २० टक्के बचत करणे शक्य आहे. उसासाठी रासायनिक खताचा वापर करण्यासाठी एकरी सुमारे ४० हजार रुपये खर्च होतो. त्याएवजी शाहू सेंद्रिय खत २० टक्के वापरले तर रासायनिक खताचा खर्च एकरी आठ हजार रुपयांनी कमी होतो. शाहू सेंद्रिय खत स्वस्त आहे. हे खत ४० किलो पिशवीमध्ये उपलब्ध आहे. शाहू समृद्ध सेंद्रिय खत मातीआड केल्यास खताची कार्यक्षमता वाढून पिकांना सहज उपलब्ध होते.त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. परिणामी उत्पादनात वाढ होते. या वर्षी हे सेंद्रिय खत प्रायोगिक तत्त्वावर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद ऊ स उत्पादक यांना पुरवण्यात येणार आहे. लवकरच खुल्या बाजारात हे खत विक्रीस उपलब्ध करण्यात येणार आहे.

अभ्यासकांची अनुकूलता

शाहू सेंद्रिय समृद्ध खताची निर्मिती केल्यानंतर त्यास मान्यता मिळवणे गरजेचे होते. यासाठी हे खत सांगली येथील ‘निखिल लॅब अँड रीसर्च’ या केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांनी तपासणीअंती खत वापरास योग्य असून त्याद्वारे अधिक उत्पादन मिळू शकते अशी शिफारस केली आहे. या संस्थेचे अध्यक्ष, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक सुहास खांबे यांनी सेंद्रिय खताची निकषांची पूर्तता शाहू सेंद्रिय खताने केलेली असल्याचे नमूद केले. ‘या खताच्या वापरामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढीस लागण्यास मदत होणार आहे. फॉस्फरस, पोटॅश याचे प्रमाण जास्त असल्याने पिकांना लाभ होणार आहे. कोल्हापूरच्या पश्चिमेकडील भागामध्ये भागातील जमिनीमध्ये झिंकचे प्रमाण कमी आहे. ते या खताच्या वापराने भरून निघेल. त्याचे चांगले परिणाम पीक वाढीवर दिसतील. आंबा, काजू ,सुपारी या पिकासही उपयुक्त आहे. उसाचे भरघोस पीक येण्याबरोबर जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल,’ असेही ते म्हणाले.

खत वापराचे एकरी प्रमाण

ऊस-२०पोती (लागणीवेळी १० पोती व भरणीवेळी १० पोती). केळी व पपई-२०पोती (लागणीवेळी १० पोती व भरणीवेळी १० पोती). द्राक्ष-४०पोती (एप्रिल छाटणीनंतर २० पोती व ऑक्टोबर छाटणीनंतर २० पोती). गळीत धान्य कडधान्ये चारापिके भात तृणधान्य पिके -५ पोती.  हरितगृह – ४०पोती. फुलझाडे, कुंडय़ा व शोभेची झाडे -१०० ते २०० ग्रॅम. फळबाग-१० पोती.

खताचे फायदे

हे खत सर्व प्रकारच्या जमिनीसाठी उपयुक्त आहे. सर्व पिकांसाठी पोषक व समतोल आहारयुक्त सेंद्रिय खत आहे. जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता सुधारून पिकांना संतुलित अन्नघटकांचा पुरवठा होतो. सेंद्रिय पदार्थाची विघटन क्षमता आणि पानांची अन्नग्रहण क्षमताही वाढविली जाते. मुख्य, दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्ये व सेंद्रिय घटकांची पिकांना समप्रमाणात उपलब्धता वाढते. क्षारयुक्त जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. क्षारपड जमिनीची वाढती समस्या यातून दूर होण्यास मदत होते. जमिनीत भुसभुशीतपणा वाढून हवा खेळती राहते व जलसंधारण शक्ती वाढते. पिकांच्या पानांची रुंदी वाढते, पाने रसरशीत होतात व पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते शिवाय जमिनीचा कस (पोत) टिकून राहतो. रासायनिक खतांचा, सूक्ष्मअन्न द्रव्यांचा आणि पीक संरक्षण औषधांचा वापर मर्यादित राहतो. शिवाय खर्चातही बचत होते. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.

कारखान्याचे संस्थापक स्व. राजेविR मसिंह घाटगे यांनी सभासद शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध उपR म यशस्वीपणे राबविण्याची परंपरा शाहू मध्ये सुरू केली आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून या शाहू समृद्ध सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे. उसाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. मात्र वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्च वाढत आहे. त्याबरोबर जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यावर पर्याय म्हणून हे दर्जेदार सेंद्रिय खत ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर शेतकऱ्यांना उधारीवर पुरविण्याचे नियोजन आहे.

– समरजितसिंह घाटगे,

अध्यक्ष, छत्रपती शाहू सहकारी, साखर कारखाना, कागल, कोल्हापूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2021 1:49 am

Web Title: organic fertilizer project in shahu factory zws 70
Next Stories
1 सोलापुरातील वाढती आंबा लागवड
2 राज्यावलोकन : ‘कोंगूनाडू’ कोणास हवे?
3 राजद्रोह कायदा हवाच; पण…
Just Now!
X