डॉ. उज्ज्वला दळवी
लोकप्रभा दिवाळी २०२०

स्थलांतराचा मागोवा घेतल्याशिवाय मानवाच्या वाटचालीची संगती लागणं अशक्यच! बाहेरच्यांना स्वीकारण्याच्या या प्रक्रियेत कमी-अधिक प्रमाणात संघर्ष निर्माण झालेला दिसतो. कधी अपरिहार्यतेमुळे तर कधी अधिक काहीतरी साध्य करण्यासाठी स्थलांतरं झाली. कारणं काहीही असली, तरी अनिश्चितता, असुरक्षितता दोन्ही बाजूंना बराच काळ भेडसावत राहिली. या साऱ्या मंथनात काहींना हलाहल पचवावं लागलं, तर काहींना अमृत गवसलं. आपलं गाव-घर-माणसं मागे सोडून आलेल्या या समुदायांनी आपापली संस्कृती मात्र सोबत नेली. स्थानिक संस्कृतीशी झालेल्या त्यांच्या मिलाफाच्या पाऊलखुणा आज आपण इतिहास म्हणून अभ्यासतो. या अभ्यासाचा पैस यापुढेही विस्तारतच जाईल. कारण, ही एक न संपणारी प्रक्रिया आहे..

‘मला घेऊन चाललेला ट्रक कुठेतरी थांबला.’

‘जिवंत असतील ते डावीकडे!’ कुणीतरी म्हणालं.

मला डावीकडे नेलं. ते कामचलाऊ हॉस्पिटल होतं. त्याचा जिना, तिथली चित्रं, ते रांगेने असलेले वर्गांचे दरवाजे. हो, ती एक शाळाच होती. फार ओळखीची वाटणारी.’

माझे दोन्ही पाय बधिर झाले होते. एक हातसुद्धा! स्ट्रेचरवाल्यांनी मला एका मोठय़ा हॉलमध्ये नेलं. ती आर्टरूम होती. तिथल्या फळ्यावर माझ्याच अक्षरातली, तीन महिन्यांपूर्वी लिहिलेली, ढब्बोडय़ा अक्षरामुळे पूर्ण न मावता अर्धवट सोडलेली कवितेची ओळ होती,’

‘वाटसरा, जा, सांग त्या स्पा..’

तिथला मदतनीस आला. तो मधल्या सुट्टीत आम्हाला दूध देत असे. मी ओळखलं त्याला. त्याने माझं डोकं थोडं वर उचललं. ते माझं मला का उचलता येत नव्हतं ते मला तेव्हाच कळलं.. माझा एक हात आणि दोन्ही पाय..नव्हतेच!

माझ्या तोंडून अस्फुट शब्द आले, ‘दूध!’

(उर्वरित लेख वाचा प्रत्यक्ष ‘लोकप्रभा दिवाळी २०२०’मध्ये. अंक बाजारात सर्वत्र उपलब्ध.)