शहरातील रेल्वे लाइन्स भागात कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील दोन विद्यार्थिनी गायब झाल्याची तक्रार सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान, यात वसतिगृहातील एका मुलीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसताना आता दोन विद्यार्थिनी गायब झाल्याने हे वसतिगृह चर्चेत आले आहे.
वसतिगृहाच्या अधीक्षिका सुवर्णा बुंदाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी पावणेआठच्या सुमारास वसतिगृहातून शीतल (वय १७) व सपना (वय १६) या दोन विद्यार्थिनी कोणासही न सांगता बेपत्ता झाल्या. काही दिवसांपूर्वी याच वसतिगृहातील एका विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या पाश्र्वभूमीवर आता एकाचवेळी दोन विद्यार्थिनी वसतिगृहातून गायब झाल्याने हे मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह चर्चेत आले आहे.