आंतरराष्ट्रीय दर्जा आणि जागतिक पातळीवर शिकवला जाणारा एमएससीआयटी हा ९ वर्षांत महाराष्ट्रातील ७५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अनुभवलेला एकमेव कोर्स आहे. डिजिटल युगात आज मोबाईलच्या स्क्रीनपासून टीव्हीच्या स्क्रीनपर्यंत सगळय़ांच्या जीवनात डिजिटल तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. घरातील प्रत्येक गोष्ट डिजिटल होत असल्याचे विवेक सावंत यांनी सांगितले.
एमकेसीएलचे दक्षिण महाराष्ट्र नेटवर्कचे वार्षिक शिबिर कराडच्या वेणूताई चव्हाण सभागृहात पार पडले. त्या वेळी मार्गदर्शन करताना सावंत बोलत होते. सनबीम ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष व मॅनेजिंग डायरेक्टर सारंग पाटील म्हणाले, की २१वे शतक हे संगणक युग आहे. प्रत्येक पालकाला वाटते, आपल्या मुलाने संगणक शिकावा. स्पध्रेच्या युगात स्वत:ला सिद्ध करावयाचे असेल तर संगणक साक्षर झालेच पाहिजे. तंत्रज्ञानात नवनवीन शोध लागत आहेत. जगाबरोबर राहावयाचे असेल तर आपण तंत्रज्ञानातील बदल आत्मसात केले पाहिजेत व त्यासाठी एमकेसीएलचा एमएससीआयटी हा सर्वोत्तम कोर्स आहे. या वेळी २०१२ या वर्षांत उत्तम कार्य करणाऱ्या ५० एमएससीआयटी केंद्रांना सन्मानित करण्यात आले. या वेळी सातारा सांगली व कोल्हापूर जिल्हा केंद्राचे समन्वयक उपस्थित होते. प्रशांत लाड यांनी सूत्रसंचालन केले. एमकेसीएलचे दक्षिण महाराष्ट्र विभागीय समन्वयक अनिल गावंडे यांनी आभार मानले.