कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या वतीने कोल्हापूर शहर महानगर अध्यक्ष महेश जाधव यांची उमेदवारी निश्चित आहे. निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न केले जाणार आहेत, असे प्रतिपादन आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.    
केशवराव भोसले नाटय़गृहामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग अध्यक्षांसह १०५ पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या वेळी आमदार पाटील प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलत होते. ते म्हणाले, पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे. अयोग्य प्रकारे वागणाऱ्या कोणत्याही पदाधिकाऱ्याची चूक सहन केली जाणार नाही. जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्यात मिसळून कार्यरत राहिले पाहिजे.     
शहराध्यक्ष महेश जाधव यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचा नमूद करून जनहिताच्या प्रश्नासाठी लढत राहणार असल्याचे सांगितले.
मेळाव्यास महिला मोर्चा आघाडी अध्यक्षपदी तेजस्विनी हराळे, भटक्या विमुक्त विभागाच्या अध्यक्षपदी श्रीकांत गुंटे, अनुसूचित जातीजमाती विभागाच्या अध्यक्षपदी नगरसेवक सुभाष रामुगडे, युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी संदीप देसाई यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा सरचिटणीसपदी राहुल चिकोडे, किशोर घाटगे, अशोक देसाई तर उपाध्यक्षपदी अमित पालोजी, किशोरी स्वामी, मारुती भागोजी, दिलीप मैत्राणी, अशोक लोहार यांचीही निवड करण्यात आली.
 मेळाव्यास अॅड.संपतराव पवार-पाटील, नगरसेवक आर.डी.पाटील, सुभाष रामुगडे, नगरसेविका प्रभा टिपुगडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

amol kolhe marathi news, shivajirao adhalarao patil marathi news
“उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवाजी आढळराव पाटील पराभूत झाले!”, ‘त्या’ विधानावरून अमोल कोल्हेंचा टोला
Prakash Awade, Lok Sabha, hatkanangle,
आमदार प्रकाश आवाडे हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात; पंचरंगी लढतीमुळे चुरस वाढली
Vanchit Bahujan Aghadi
औरंगाबादमध्ये एमआयएमच्या विरोधात वंचितचा मुस्लीम उमेदवार, मतविभाजनाचा आणखी एक प्रयोग
Hatkanangale election
कोल्हापूर : राहुल आवाडे हातकणंगलेच्या रिंगणात; मशाल हाती घेणार ?