प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन ‘एसटी’तर्फे मुंबई-ठाणे येथून अलिबाग/मुरूड, गणपतीपुळे, अष्टविनायक दर्शनासाठी माफक दरात विशेष सहली नेण्यात येणार आहेत.
दादर-अलिबाग/मुरूड ही यापैकी एक फेरी असणार आहे. हिरकणीची निमआराम सेवा यात दिली जाईल. रविवारी ९, १६ आणि २३ फेब्रुवारीला या विशेष फेऱ्या होतील. सकाळी साडेसहा वाजता दादरहून ही गाडी सुटेल. अलिबाग किल्ला, काशिद, मुरूड, राजपुरी, जंजिरा किल्ला, बिर्ला मंदिर अशी ठिकाणे करून ही गाडी रात्री ९.३० वाजता परत येईल.
दुसरी सेवा ठाणे-गणपतीपुळे अशी असणार आहे. ही साधी परिवर्तन सेवा असेल. शनिवारी ८ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता ठाणे मध्यवर्ती स्थानकावरून सुटून ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता परत येईल. यात मार्लेश्वर, गणपतीपुळे, डेरवण, परशुराम या ठिकाणांना भेट दिली जाईल.
ठाणे-अष्टविनायक दर्शन ही दोन दिवसांची साधी परिवर्तन सेवा एसटी देणार आहे. शनिवारी ८ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता ही सहल ठाणे मध्यवर्ती स्थानकावरून सुरू होईल. दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता ही गाडी परत येईल. सिध्दीविनायक मंदिर-अष्टविनायक दर्शन ही आणखी एक दोन दिवसांची साधी परिवर्तन सेवा एसटी १५, १७, १८ आणि २२ फेब्रुवारी रोजी देणार आहे. सकाळी ६.३० वाजता ही सहल प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरापासून सुरू होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता परत येईल.
गणपतीपुळे व अष्टविनायक दर्शन सहलीत राहण्याची व्यवस्था संबंधित देवस्थानाच्या भक्तीनिवासात करण्यात येणार असून या निवासव्यवस्थेचा तसेच इतर अल्पोपहार व भोजनाचा खर्च प्रवाशांनी करावयाचा आहे. या सर्व सेवांचे आरक्षण, गाडीचा मार्ग, तिकिट दर एसटी महामंडळाच्या ६६६.े२१३ू.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावर तसेच सर्व आरक्षण केंद्रांवर उपलब्ध आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 5, 2014 8:02 am